logo

BREAKING NEWS

मुख्यमंत्री सडक योजनेच्या रस्ता कामासाठी वृक्षाची कत्तल

पर्यावरण प्रेमी नागरीकातून गुत्तेदारच्या कामकाजाबाबत नाराजी

हिमायतनगर, किनवट- नांदेड राज्यमार्गापासून ते वायफन- येवली या ७.०६ कि.मी.रस्त्याची सुधारणा करण्याचे काम जनावर २०१७ पासून सुरु करण्यात आले आहे. सदरचे काम करताना संबंधित गुत्तेदाराकडून सर्व नियम धाब्यावर ठेऊन रस्त्यालगतच खदान तयार करून उत्खनन केले जात आहे. एवढेच नव्हे तर रस्ता कामात येणाऱ्या मोठ्या मोठ्या वृक्षाची कत्तल केली जात असल्याने पर्यावरणाची हानी होत असल्याने पर्यावरण प्रेमी नागरीकातून गुत्तेदारच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील राजवाडी फाट्यापासून ते येवली पर्यंतच्या ७.०६ कि.मी.लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण, सुधारणा व डांबरीकारन व ०६ पूलमोर्यांचे काम ०४ जानेवारी २०१७ रोजी सुरु करण्यात आले असून वर्षभराच्या मुदतीत हे काम पूर्ण करावयाचे आहे. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे कार्यकारी अभियंता सुधीर पाटील यांच्या यंत्रणेमार्फत मी.जयसाई कन्स्ट्रक्शन उस्मानाबाद कंत्राटदाराच्या वतीने केले जात आहे. यासाठी ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने ३०९.०२ लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे. सादरही काम करताना संबंधित गुत्तेदाराने देखरेख करणारे उप अभियंता जोंधळे यांच्या संगनमताने अंदाजपत्रकाच्या बगल देत करण्याचा खटाटोप सुरु केला आहे. या कामासाठी लागणारी गिट्टी, दगड, मुरूम गौणखनिज वापराची लैंडींग दिलेल्या ठिकाणहून न करता रस्त्यागतच खदान तयार करून गौण खनिज काढले जात आहे.

खरे पाहता कोणत्याही गौण खनिजाचे उत्खनन हे रस्त्याच्या ५० मीटर दूरवर असावे असे महाराष्ट्र गौण खनिज अधिनियम १९६६ अनुसर म्हंटलेले आहे. असे असताना संबंधित गुत्तेदाराने रस्त्याच्या कडेलाच जोडकाम करून त्याच मुरुमांचा रस्ता कामासाठी वापर केला आहे. एवढेच नव्हे या रस्त्यावरील अनेक मोठं मोठे लिंबाचे वृक्षाची तोड करण्यात आल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शासन वृक्ष लावा वृक्ष जागवाचा संदेश देत असताना शासनाच्या रस्ते विकास कामाच्या नावाखाली वृक्षाची कत्तल केली जात असल्याने विकासप्रेमी व पर्यावरण प्रेमी नागरीकातून गुत्तेदार व अभियंत्याच्या  कामकाजाबाबत नाराज व्यक्त केली जात आहे.       

    Tags