logo

BREAKING NEWS

सततची नापिकी व कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांनी घेतला गळफास

हिमायतनगर, तालुक्यातील मौजे पारवा खु येथील एका शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जबाजारील कणटालूं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. १५ रोजी घडली आहे.  

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गेल्या काही वर्षांपासून तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. असे असताना शासनाकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नसल्याने अल्पभूधारक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. काही केले तरी दारिद्र्य संपत नसल्याने मौजे पारवा खु. येथील शेतकरी प्रकाश नामदेव पतंगे वय ३५ या तरूण शेतकऱ्यांने दि. १५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी व कर्जाच्या चिंतेने तो ग्रासला होता. याच नैराश्येत सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन त्याने मृत्यूला कवटाळले. त्याच्या नांवे १ हेक्टर ७५ आर जमीन असून, यावर त्याने भारतीय स्टेट बँक सरसम शाखेचे ३५००० रुपये कर्ज घेतले होते. यंदा शासन कर्जमाफी देईल अशी अशा त्याला लागली होती, मात्र शासन काही केले तरी कर्जमाफी देत नाही हे लक्षात आले, तसेच घरातील हलाकीची परिस्थितीने हैराण झाल्याने त्याने टोकाची भूमिका घेऊन जीवन यात्रा संपविली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्याच्या मृत्यू पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे कुटुंब निराधार झाले असून, यातून सावरण्यासाठी शासनाने तातडीने शेतकरयांच्या कुटुंबियांना मदतीचा हातभार लावावा अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.

    Tags