LOGO

हिमायतनगरमध्ये उष्णतेचा बळी... पोटा बु. येथील घटना

प्रतिनिधी - 2017-05-16 18:46:51 - 312

हिमायतनगर, गेल्या महिन्याभरापासून उष्णतेने उचांक गाठला असून, ४५ अंश सेल्सीअसचा आकडा पार केला आहे. अश्या परिस्थितीत पोटाची खळगी भरण्यासाठी स्वयंपाकाच्या कामावर गेलेल्या एका ३० वर्षीय शेतमजुराचा उन्हाचे चटके लागल्याने मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मौजे पोटा बु.येथे घडली आहे. या घटनेमुळे पोटा बु. गावावर शोककळा पसरली आहे. 

उष्णतेच्या लाटेबाबत तापमानात तीव्र वाढ झाल्यामुळे आरोग्य विभाग व प्रशासनाने उष्माघातापासून बचावाचे उपाय योजन्याचे आवाहन केले आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून आभाळात दाटून येणारे ढगांच्या गर्दीमुळे आणि मृग नक्षत्राच्या तयारीसाठी शेतात शेतकरी, मजुरदार राबत आहेत. मौजे पोटा बु.येथील कैलास प्रल्हाद वच्चेवार नामक ३२ वर्षीय युवक हा शेतमजुरी, स्वयंपाकी यासह मिळेल ते काम करून कुंटुंबाची उपजीविका भगवायचा. उन्हाच्या तीव्रतेमुळे अंगाची लाही लाही होत असताना आज दि.१६ रोजी एका ठिकाणी मिळालेले स्वयंपाकाचे काम आटोपून कैलास दुपारी घराकडे परत येत होता. दरम्यान ऊन जास्त असल्याने रस्त्यातील शेतीतील झाडाचा आसरा घेऊन झोपला. दरम्यान त्याने कसे तरी होतेय असे म्हणत फोनवरून घरच्यांना माहिती दिली. ताबडतोब घरच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी रूग्णालयात आणण्यासाठी शेताकडे गेले, घेऊन येताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अचानक जाण्याने आई, पत्नी धाय मोकल्याने रडू लागली असून, त्याच्या मृत्यू पश्चात आई, पत्नी मुलगा ओंकार, मुलगी निकिता असा परिवार आहे. उष्माघाताने त्याचा बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, पोटा गावावर शोककळा पसरली आहे.         
       
उष्माघातापासून बचावाच्या उपाय योजना कराव्यात
नांदेडचा उष्माघात - प्रवण जिल्हे म्हणून उष्माघात प्रतिबंधक कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. या जिल्ह्यांसाठी उष्माघात प्रतिबंधक कृती आराखडा अंमलात आनण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात ३१ मार्च पासून सातत्याने कमाल तापमान ४२ सेल्सीअस अंश राहिले आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने आजवर ४३ सेल्सीअस अंश, ४४ सेल्सीअस अंश आणि ४५ सेल्सीअस अंश पर्यंत तापमान वाढून यंदा हा आकडा पार केला आहे. उष्माघात कृती आराखडा अन्वये जिल्ह्यात तीव्र तापमान बदलाबाबतचा इशारा देण्यात येऊन, त्यानुसार नागरिकांनी उष्माघातापासून बचावाच्या उपाय योजना कराव्यात. तीव्र तापमानामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणाम प्रतिबंध करण्यासाठी जेष्ठ नागरीक, लहान मुले, रुग्ण आदींची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन आयोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Tag:
Download our mobile app here :

Contact us

C/O Utkarsh PhotoGallary,
Narsinha Digital photo,
Rukhmini Nagar, At.Post.& Tq.Himayatnagar
Dist. Nanded. Pin - 431802.

+91 9764010107, +919767121217, +919420538747.

02468-244739

anilmadaswar@gmail.com,
nandednewslive@gmail.com,

Back to Top