logo

हिमायतनगर, नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतीने आता विकासा बरोबर शहर हागंदारीमुक्त करण्यावर भर दिला आहे. त्याअंतर्गत वयक्तीक शौचालय नसलेल्या १ हजार ३५० लाभार्थ्याचा सर्वे करण्यात आला असून, त्यापैकी १०२३ लाभार्थ्यांना शौचालय बांधकामासाठीच्या पहिल्या हप्त्याची रक्कम नगराध्यक्ष अ. अखिल अ.हमीद व प्रभारी मुख्याधिकारी हारिकल्याण यलगटे यांच्या स्वाक्षरीने थेट लाभार्थ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्यात आले आहे. 

हिमायतनगर शहराला स्वच्छ व सुंदर शहर बनविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वच्छ भारत योजनेनंतर्गत शहरात हागणदरीमुक्त योजना राबविली जात आहे. शहरातील पळसपूर रोड, टेभी - पार्डी रस्ता, फुलेनगर, परमेश्वर गल्ली, लाकडोबा चौक, सिरंजनी रोड, बोरगाडी रोड सह परिसरात उघड्यावर शौचास जाणाऱ्या ठिकाणी नगरपंचायती मार्फ़त सार्वजनिक शौचालयाची उभारणी केली जाणार आहे. तसा प्रस्ताव अन्तीम टप्प्यात आला असून, लवकरच काम सुरु होणार आहे. तसेच उघड्यावर शौचास जाणारया नागरिकांना आळा घालून शहर स्वच्छ व दुर्गंधीमुक्त करण्यासाठी नगरपंचायती मार्फत कार्यालय निरीक्षक बालाजी माळचापुरे, लेखापाल रामसिंह लोध, वरिष्ठ लिपिक शे.महेबूब बंदगी साब, मारोती हेंद्रे, बालाजी हरडपकर, विठ्ठल शिंदे, शेख रब्बानी, श्याम मांडोजवार यांच्यासह पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांचे गुडमॉर्निंग प्रथम कार्यान्वित करण्यात आले आहे. यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी वयक्तिक शौचालय किंवा सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा असे आवाहन करीत स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जात आहे. 

यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यावरही जे नागरिक उघड्यावर शौचालयास जात असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर भादंवि १८६० चे कलाम २६८, २६९, २७०, २७८ अन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कार्यवाह केली जाणार आहे. हि बाब लक्षात घेता नागरिकांनी उघड्यावर शौचालयास ना जाता वयक्तिक अथवा सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा असे आवाहन नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी हारिकल्याण यलगटे, नगराध्यक्ष अ. अखिल अ.हमीद, उपनगराध्यक्ष सौ.सविताताई अनिल पाटील, नगरसेवक नगरसेविकांनी यांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून केले आहे.  

    Tags