Breaking news

नवसिद्धी गडावरील महादेव - अन्नपूर्णा - श्रीराम दर्शनाला अनन्य साधारण महत्व

नांदेड(खास प्रतिनिधी)निझामाबाद जिल्ह्यातील आरमुर मंडल शहराला लागून असलेल्या विशाल गडावर गेल्या हजारो वर्षांपासून नवनाथांनी स्थापित केलेल्या महादेवाचे मंदिर आहे. येथील गडावर वसलेल्या शिवलिंगाचे व माता अन्नपूर्णा देवीचे दर्शन घेण्यासाठी भुयारी मार्गातून जावे लागते.

नवसिद्धी गडावर जाताना प्रथम नवनाथांचे दर्शन लांबते, त्यानांतर उंच रास्ता पार करत जाताना मोठ्या कठीणाईचा सामना करावा लागतो. रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या दगडी शिळा हजारो वर्षांपूर्वीच्या असल्याची साक्ष देतात. गडावर चढल्यानंतर जवळपास 2 कि.मी.अंतर पार करावे लागते, दरम्यान हिरवाईने तळलेला डोंगर डोंगरावरून आरमुर शहराचे दिसणारे विहंगम दृश्य सेल्फी काढण्यास भाग पडतात. त्यानंतर गाद पार करून खोल दरीत उतरल्यानंतरच्या गडामध्ये दगडाच्या भुयारात (शिवालय) महादेव मंदिर आहे. येथे काळ्या पाषाणातील दगडाचे शिवलिंग असून, माता अन्नपूर्णा देवी, गणपतीची मूर्ती व नंदी महाराजही स्थापित आहे. तसेच महादेवाचे दर्शन घेऊन परत येणाऱ्या दुसरा भुयारी मार्ग हा थेट मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या मंदिराकडे निघतो. श्रावण मासात दर्शनाला अनन्य साधारण महत्व आहे. तसेच दर महिन्याची शिवरात्र आणि दर सोमवारी या ठिकाणी भक्तांची मांदियाळी असते. गडावर मोठ्या कठीण रस्ता पार करून दगडाच्या खाणीतून जात दर्शन घ्यावयाचा अद्भुत अनुभव येथे भक्तांना मिळतो आहे. गेल्या काही वर्षांपासून येथील मंदिराच्या विकासासाठी प्रयत्न होत आहेत, त्यामुळे गडावर जनयपर्यंत डांबरी वळण रस्ता तयार झाला असून, आता वर पर्यंत दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन जाने सोईचे झाले आहे. एक वेळा या गडावर गेलेला व्यक्ती वारंवार येथे आल्याशिवाय राहत नाही हे विशेष.

Related Photos