Breaking news

मुखेडचे जागृत ग्रामदैवत श्री वीरभद्र स्वामी

मोहनावती नदीच्‍या तीरावर वसलेल्‍या मखेड शहरास एैतिहासिक व पोराणिक अशी परंपरा आहे. या शहराचे प्राचीन नाव मोहनावती असल्याचा उल्‍लेख आहे. मुखेड शहरात प्राचीन काळातील हेमाडपंथी महादेव मंदीर आहे, हे मंदीर कलात्‍मक व भव्‍य स्‍वरूपाचे आहे. अशाच प्रकारचे मुखेडचे ग्रामदेवत म्‍हणून ओळखले जाणारे श्री वीरभद्र स्‍वामीचे मंदीर आहे. मुखेड हे तालूकयाचे ठिकाण असून शहराच्‍या मध्‍यभागी एक ते दिड एकर जागेत हे भव्‍य सवरूपाचे मंदीर उभारण्‍यात आले आहे, मंदीर पुर्वाभिमुख आहे. मंदीरात प्रवेश उजव्‍या बाजूला दोन व डाव्‍या बाजूला दोन अशा चार दिपमाळा आहेत. याच दिपमालेवर मंदीरात रात्रीच्‍यावेळी प्रकाश रहावा म्‍हणून दिवे लावले जात असावेत, भाविक भक्‍ताच्‍या पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था व्‍हावी म्‍हणून मंदिर परिसरातच एक विहीर खेादण्‍यात आली आहे. मंदीराचे बांधकाम दगड व चुन्‍याच्‍या सहायाने पुर्ण केले आहे. मंदीराच्‍या बांधकामाचा निश्चित कालखंड सांगणे पुराव्‍याच्‍या अभावी शकय नाही. मंदीरात प्रवेश करताच अनेक देवी देवतांच्‍या मुर्ती पहावयास मिळतात. नागदेवता, पंचमुखी – परमेश्‍वरी नंदी, इ. मंदीराच्‍या मुख्‍य गाभा-यात ग्रामदेवत वीरभद्र देवतेची मुर्ती आहे. ही मुर्ती काळया पाषानाची आहे. भावीकांसाठी एक भव्‍य सभागृह आहे. मंदीराच्‍या उजव्या बाजूर एका देवतेची मुर्ती आहे.

वीरभद्र स्‍वामी बाबतची अख्‍यायिका
-----------------------
वीरभद्र स्‍वामी देवतेबदल कांही पोराणिक कथा सांगीतल्‍या जातात त्‍या अशा आहेत. पुर्वीच्‍या काळी मोहनावतीत मूक्‍काम करण्‍यास भाविक भक्‍त भीत असतं, कारण इथे मुक्‍काम करेल तो मृत्यू पावेल अशी समजूत होती. लोक गावाबाहेर मुककाम करीत. एक वेळेस असे झाले की, कर्नाटकमधील बसवकल्‍याण येथील भावीक भक्‍तांचा मुक्‍काम गावाबाहेर होता. रात्र झाली होती, भाविक गाढ झोपेत असतांना अचानक आवाज आला मला काढा म्‍हणून भावीकांनी दुस-या दिवशी तो परिसर खोदून काढला त्‍यामध्‍ये वीरभद्र देवतेची मुर्ती सापडली अशी लोककथा आहे.

त्रेयुगातील एक कथा
--------------------
शिवलिलामृत या धार्मिक ग्रंथात या कथेचा उल्‍लेख आलेला आहे, दक्ष नावाचा राजा होता. त्‍याला अनेक मुली होत्‍या. त्‍यापैकी पार्वती नावाची एक कन्‍या होती. पार्वतीने आपल्या वडिलाच्या इच्‍छे विरूध्‍द हवा असलेला वर निवडला. तो वर म्‍हणजे शंकर होय. पार्वतीच्‍या या कृत्यामुळे दक्ष राजा कोधीत झाला. कांही काळांतराने दक्ष राजाने महायज्ञ करण्‍याचे ठरविले. सर्व मुलींना व विष्णूसह सर्व देवतांना निमंत्रणे पाठविली. परंतू जावाई शंकर व कन्‍या पार्वतीस मात्र महायज्ञास निमंत्रन पाठवले नाही. त्‍यामुळे पार्वती खूप नाराज झाली. तेवढयात नारदमुनी घरी येवून महायज्ञाची बातमी पार्वतीच्‍या कानी टाकतात. तेव्‍हा शंकर पार्वतीस म्‍हणतात की, निमंत्रण नसतांना आपण जाणे उचित नाही म्‍हणून पार्वतीस महायज्ञास जाण्‍यासाठी मज्‍याव करतात. पण नारद मुनी पार्वतीस म्‍हणतात की, वडिलांच्‍या घरी जाण्‍यासाठी निमंत्रणाची गरज नाही. पार्वतीने शंकराकडे माहेरी जाण्‍याचा आग्रह धरला. शेवटी स्‍त्री हटापाई शंकराने पार्वतीस माहेरी जाण्‍याची परवानगी दिली. पार्वती हे आपले नंदी वाहण घेवून माहेरी पोहचली. तिथे तशा प्रकाराचा मान सन्‍मान तीचा झाला नाही. त्‍यामुळे पार्वतीस अपमान वाटले. तिने रागाच्या भरात स्‍वताला यज्ञकूंडात झोकून दिले. तेव्‍हा हि बातमी नंदीने शंकरास सांगीतली. शंकर क्रोधीत होवून त्‍यांनी स्‍वताच्या जटा ममिनीवर आपटण्‍यास सुरूवात केली. त्‍यातूनच वीरभद्राची निर्मिती झाली. शंकराने विरभद्र देवतेस आज्ञा केली की, महायज्ञाचा विध्‍वंस करावा. वीरभद्र स्‍वामी दक्ष राजाला म्‍हणाले की, हे राजा तू अहंकाराने व सामर्थ्‍याच्‍या गर्वाने भगवान शंकराची निंदा केलीस त्‍याचा परीनाम भोगण्‍यास तयार हो आणि म्‍हणून खडगाने दक्ष राजाचे मुंडके उडवीले. व यज्ञकुंडात फेकून दिले. तेव्‍हा दक्षराजाने नातेवाईक शंकरास शरण जावून उपवर मागीतला, तेव्‍हा शंकराने वीरभद्र देवतेला आज्ञा देवून ऐडकयाचे मुंडके दक्ष राजाच्‍या शरिरास लावून दक्षराजास जिवंत केले.

आजही वीरभद्र देवतेच्‍या मुर्तीच्‍या बाजूस एडक्‍याचे मुंडके असलेली दक्षराजाची मुर्ती आहे. हाती तलवार व क्षडगे धारण केलेले आहे. म्‍हणून त्‍याचे भावीक भक्‍त ऐडक्‍याचा आवाज काढून त्‍याचे दर्शन घेतात. वीरभद्र देवतेच्‍या उजव्या हाती त्रिशूल व डाव्या हाती खडगे आहे. गळयामध्‍ये रूडमाळा (राक्षसाचे मुंडके) आहे या देवताचा उत्‍सव कार्तिक वद्य पोर्णिमेपासून पाच दिवस चालतो. पहिल्‍या दिवशी मानक-यांचा अभिषेक व हळद लेपनाचे कार्यक्रम दुस-या दिवशी पण भक्‍त गणाचे अभिषेक होतात. भजन, पुजन केले जाते. तिस-या दिवशीही असेच रूद्राभिषेक होतात. चौथ्‍या दिवशी अभिषेक नौबत नगारा नावाचे वाद्य वाजवतात. पाचव्‍या दिवशी पहाटे चार वाजता अभिषेक पाच वाजता अग्‍निकूंड पेटवला जातो. त्‍यातून वीरभद्र पालखी घेवून प्रथम सवामी जंगम व मागे भक्‍तगण या अग्निकूंडातून मार्गक्रमन करतात. अग्निकुंडाचया बाहेर पडलेला विस्‍तव मात्र पोळत असतो. अग्निकुंडातून जातांना पोळत नाही हा एक चमत्‍कार म्‍हणावा लागेल.

मुखेड येथील जागृत ग्राम दैवत श्री वीरभद्र स्‍वामी यात्रेनिमीत्‍त महाराष्‍ट, आंध्रप्रदेश, कर्नाटक या तीन राज्यातील हजारो भावीक मुखेडात दाखल झाले असून वीरभद्र मंदीरात दर्शनासाठी गर्दी होत आहे. अग्निकुंडाचा व पालखी कार्यक्रम सोमवारी दि 01 डिसेंबर रोजी आयोजित करण्‍यात आली आहे. ही यात्रा दि 30 नोव्‍हेंबर ते 01 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. नगर पालीका व मंदीर संस्‍थानच्‍या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्‍यावा असे अवाहण नागायअप्‍पा स्‍वामीच्‍या वंशावळीतील पुजारी राजकुमार कोंडायअप्‍पा स्‍वामी या वर्षाचे श्री. वीरभद्र देवस्‍थानचे पुजारी यांनी केले आहे. ...................शिवकांत मठपती, मुखेड

Related Photos