Breaking news

पाण्यात बुडलेले रामलींगेश्वर स्वामीचे (शिवालय) १३ वर्षानंतर बाहेर...

निझामाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक कुस्तापूर जवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठावरील रामलींगेश्वर स्वामीचे अनेक वर्षानंतर पाण्यात असलेले मंदिर पाणी पातळी खालावल्याने उघडे पडले आहे. याची माहिती मिळताच दर्शनासाठी भाविकांचे गर्दी होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, निझामाबाद जिल्ह्यातील मंडल मलकापूर व नंदिपेठच्या मधोमध्ये असलेल्या मौजे कुस्तापूर जवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठावरील महादेवाचे मंदिर गेल्या अनेक वर्षापूर्वी पाण्यात बुडलेले रामलींगेश्वर स्वामीचे (शिवालय) मंदिर या वर्षी अल्प पावसामुळे उघडे पडले आहे. सदर मंदिरातील महादेवाची मूर्ती हजारो वर्षापूर्वी श्रीरामाने वाळूपासून बनविलेली असून, या मूर्तीला बनविताना गवताच्या काड्या लागल्याने पाठीमागील भागात भेग पडलेली दिसत आहे. अतिशय सुंदर व सुबक शिवलिंगाच्या मूर्तीसह मंदिर गेल्या दशकापूर्वी उभारण्यात आलेल्या गोदावरी नदीवरील श्रीरामसागरच्या डेंममुळे मंदिर पाण्यात बुडाले होते. त्यावेळी कुस्तापूरसह जवळपास ३५ गावे पाण्याखाली येत असल्याने त्यांचे पुनर्वसन करण्यात आल्याचे नागरिक सांगतात. मात्र पुनर्वसनात गेलेल्या जमिनी व आजची घरे यात खूप अंतर असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

गोदावरी नदीचे पत्र हे जवळपास १० ते १२ कि.मी. असून, आजूबाजूच्या गावापासून पहिले तर सर्वत्र शुभ्र आकाश व सपाट नदीचे पत्र दिसून येत आहे. अल्प पावसामुळे विस्तारलेले पत्र कोरडे पडले असून, नेहमी पाणी राहणार्य अजमिनीतील गवत पायाला जणू रेशमासारखे भासत आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी पाण्याची पटली कमी कमी झाल्याने मंदिर आणि, पूर्वीच्या गोदावरी नदीच्या पत्राच्या काठावर असलेले अनेक मंदिरे व उंच शिखरे अजूनही पाण्यात दिसून येतात. आजघडीला उघडे पडलेले शिवमंदीर हे पाषाण दगडाने उभारलेले असून, जवळपास ५० बाय ५५ फुट जागेत उभारलेले आहे. तर मंदिराची उंची जवळपास १२ फुट उंच तर शिखर ३५ फुटाहून अधिक उंच दिसून येत आहे. हे मंदिर कोरीव दगडी शिळांवर उभारल्या गेले असून, मंदिरात जाण्यासाठी ३ फुटाच्या दगडी प्रवेश द्वारातून आत जावे लागते. आतमध्ये गर्भगृहातील भुयारात ५ फुट खोलमध्ये विशाल शिवलिंग आहे. तसेच मंदिराच्या डाव्या बाजूच्या गर्भगृहात नागदेवतेचे अंत्यंत रेखीव शिल्प कोरलेले असून, उजव्या बाजूला विविध देवी देवतांच्या मुर्त्या आहेत, या मंदिराचे व मुर्त्यांचे काम आजच्या कलाकारांना लाजवेल अश्या कलाकृतीचा उत्कृष्ठ नमुना आहे. सदर मंदिर पाहण्यासाठी निझामाबाद, नंदिपेठ, डोंकेश्वर, अन्नाराम या गावापासून पुढे जात येईल. अनिल मादसवार..9767121217

Related Photos