Breaking news

भक्तीच्या मार्गाला लावणारे गुरु रामबापू महाराज

अज्ञानी समाज बांधवाना भक्तीचा मार्ग दाखविणारे श्री गुरु समर्थ रामबापू महाराज यांच्या ७७ व्या महा पुण्यतिथिनिमित्त दि.१४ फेब्रुवारीपासून साप्त्यास प्रारंभ होणार आहे. त्या निमिताने त्यांच्या कार्याची गाथा भक्तांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहोत....संपादक

नांदेड - किनवट राज्य रस्त्यालगत असलेल्या दुधड - वाळके वाडी येथे रामबापू महाराजाची समाधी स्थळ असून, दि.१४ रविवारी ७७ वि पुण्यतिथी व यात्रा उत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, दर्शन सोहळ्यासाठी विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तेलंगाना राज्यातून हजारो भाविक भक्त दाखल होतील अशी माहिती रामबापूमठ संस्थानचे आर्चक श्री प्रकाश महाराज यांनी दिली आहे.

श्री गुरु समर्थ रामबापू महाराजांचा जन्म १८७४ साली हदगाव तालुक्यातील मनाठा माळसावरगाव येथील ब्रम्हदेवाच्या वस्तीत झाला. वयाच्या १८ व्या वर्षी आपल्याकडील सर्व जमीन भक्तांना दान करून झाडेगावकर यांच्या कृपाप्रसादाने परमार्थाचा मार्ग अवलंबविला. त्यावेळी आपले घर - दार परिवार सोडून हदगाव - हिमायतनगर परिसरातील सर्व खेड्या पाड्यात पाई जाऊन अज्ञानी समाज बांधवाना भक्तीच्या मार्गाला लावले. त्यानंतर हिमायतनगर तालुक्यातील जंगलाच्या पायथ्याशी वसलेल्या दुधड वाळके - वाडी परिसरात राहून त्याच ठिकाणी १९३९ मध्ये संजीवनी समाधी घेतली. त्यापूर्वी रामबापूनी आत्मशक्तीच्या जोरावर पलंगावर सव्वा हाथ उंच आकाशात येउन भक्तांना दर्शन दिले तेंव्हा गावकर्यांनी सव्वा खंडीच्या गव्हाचे अन्नदान केल्याची आख्यायिका गावकरी व जुन्या जाणकार मंडळीकडून सांगितली जाते. त्यावेळी गावकर्यांनी येथे दगडाने मोठे मंदिर उभारले आज या मंदिराचे बांधकाम भक्तांच्या सहकार्यातून सुरु असून, लवकरच हे पूर्णत्वास जाणार आहे.

तेंव्हापासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात रामबापुची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यानिमित्त सप्ताह व गावातील मुख्य रस्त्याने पालखी मिरवणूक, कीर्तन भजन, यासह अन्य धार्मिक कार्यक्रम करून मोठी यात्रा भरविले जाते दरम्यान यात्रेला विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तेलंगाना राज्यातील भक्तमंडळी हजारोच्या संखेने हजेरी लावतात. गेल्या दोन वर्षापूर्वी ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त १० कोटीच्या वर नामजप पूर्ण झालेल्या वह्या भक्ताकडून संस्थानला प्राप्त झाल्या होत्या हे विशेष होय.
अनिल मादसवार, नांदेड न्युज लाईव्ह संपादक

Related Photos