Breaking news

पाळजच्या गणरायाच्या दर्शनाला यंदा उसळणार भक्तांची अलोट गर्दी

तेलंगणा - मराठवाड्याच्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाळज येथील लाकडी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सवात लाखो भाविकांनी मोठी गर्दी होते. या ठिकाणी दरवर्षी भाविकांची संख्या वाढत असल्याने पाळजच्या गणरायाला मोठे महत्व प्राप्त झाले असून, दुष्काळाच्या झळा सोसतही लाखो भाविकांनी दर्शनासाठी गेल्या 68 वर्षांपासून रांगा लावत असल्याचे चित्र पाहावयास मिळते असे दर्शनासाठी येणारे भाविक सांगतात.

तत्कालीन आंध्रप्रदेश सध्याचे तेलंगाना - मराठवाड्याच्या सीमेवरील असलेल्या भोकर तालुक्यातील पाळज येथे १९४८ मध्ये स्थापन झालेली लाकडी गणेशाची सुबक मूर्ती आहे. दर वर्षी गणेशोत्सव काळात सदरची मूर्ती बाहेर काढण्यात येउन भक्तांच्या दर्शनासाठी ठेवली जाते. गणेशोत्सव पर्व काळात गणरायाचे दर्शन घेण्यासाठी तेलंगाना, विदर्भ, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांची मांदियाळी होते. गणेशोत्सव काळात दररोज ६० ते ७० हजाराहून अधिक भाविक दर्शनसाठी रांगा लावतात.

गतवर्षी 9 लाख आले होते, यावर्षी 10 लाख भाविकांच्या सुविधेचा नीयोजन करण्यात आले आहे. कायस्वरूपी मंडप व्यवस्था करण्यात आली असून, विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, दोन आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, भजन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात तेलंगणा, महाराष्ट्र राज्यातील नामवंत कीर्तनकार उपस्थिती लावणार आहेत. अशी माहिती मंदिर समितीच्या विश्वस्थ श्री चाटलावर व गावकर्यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना दिली आहे.

दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्यासाठी दररोज ४० ते ५० क्विन्टल महाप्रसादाचे वितरण करण्यात येते. दर्शनासाठी आलेल्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर समिती व गणेश गन्दमवार उपाध्यक्ष, राजेश्वर चुकाबोटलावाड, सचिव लक्ष्मण वजलवाड, कोषाध्यक्ष शंकर शिंदे, सरपंच सुरेश चटलेवार, माजी सरपंच सुभाष चटलावार, रघुवीर बंजलवार, संतोष चपलवाड, गिरी महाराज, बालाजी पपुलवार, साईनाथ असरवाड, गोपाल वंगलवाड यांच्यासह गावकरी नागरिक सर्व व्यवस्था ठेवून परिश्रम करतात. त्यामुळे येथील गणपतीची ख्याती दूरवर पसरली असून, मंदिर परिसरात दर्शनार्थीना कुठलीही अडचण अथवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून भोकर येथील पोलीस प्रशासन दक्ष राहणार आहे. मनोजसिंह चौव्हाण, भोकर 8856858888

Related Photos