Breaking news

महान संत साधू महाराज

श्रीसंत साधू महाराजांबद्दल सांगितले जाते कि, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (वाढोणा) या गावात सण 1800 मध्ये तुप्तेवार कुळामध्ये झाला. त्यांचे नाव माधव वडिलांचे नाव सदाशिव तुप्तेवार व आईचे नाव पार्वतीबाई होते. जणूकाही बालपणापासूनच शंकराची कृपा दृष्टी झाल्याने श्रद्धा, प्रेम, भक्ती, ज्ञानची वृष्टी झाल्याने माधव महादेवाच्या विविध आकाराच्या मातीच्या पिंड बनवून खेळायचा, पूजा करायचा. त्याचे हे वेड पाहून आई - वडील आश्चर्यचकित होत तर कधी काळजी करायचे. मोठा झाल्यावर स्वभावात फरक पडेल असे वाटले. परंतु माधव 10 - 12 वर्षाचा झाला तरी त्याचे शिवपूजनाचे वेड कमी होण्याऐवजी उलट वाढतच गेले. आई - वडिलांना न सांगता गावागावात भटकंती करून भक्तीचा प्रसार करणे, उपदेश देऊन धार्मिकतेची भवन वृद्धिंगत करणे हा दैनंदिन कार्यक्रम सुरु झाला. दरम्यान घरच्यांनी लग्नाचा प्रयत्न केला, तो असफल झाला. दरम्यान परमार्थ साधण्यासाठी गुरूच्या शोधात फिरताना महद्वाची बापू महाराजांची भेट झाली. त्यांच्या सानिध्यात राहू लागला, माधवची श्रद्धा पाहून बापू महाराजांचीए महादेव साधू महाराजांचा गुरुमंत्र दिला.

त्या दिवसापासून साधू महाराज गुरु बापूंची श्रद्धापूर्वक सेवा करू लागले. साधू महाराजांची गुरूंना सुद्धा विरसनी येथे स्थायिक केले. तसेच आपली कर्मभूमी विरसनी असल्याचे सांगून भगवान शंकराने आपला महानिर्वानामाचा दिवस कार्तिक शुद्ध दशमी हा निवडला. त्या दिवशी महाराजांना शिवमंत्र देऊन यापुढे माझे कार्य निरंतर चालू ठेव असे सांगून देह ठेवला. त्यामुळे गावो गावी असलेले साधू महाराजांचे भक्त मंडळींचा जनसागर विरासणीत उसळला होता. साधू महाराजांना जाड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. महादेव साधू महाराजांनी निर्देश दिल्यामुळे त्यांनी सांगितलेल्या ठिकाणीच एक समाधी बांधण्यात आली. कालांतराने बारसं येथील प्रतिष्ठित व्यापारी व्यंकोबा अप्पा मोतेवार यांच्यासह सर्वांच्या सहकार्याने गुरु मंदिराच्या शेजारीच साधू महाराजांचे मंदिर उभारण्यात आले. तेंव्हापासून महादेव साधू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्तिक शुद्ध दशमी, एकादशी आणि द्वादशीला भव्य यात्रा उत्सव भरविला जातो. मराठवाडा, तेलंगणा, विदर्भ आदी राज्यातील भाविक - भक्त श्रद्धेने येतात. सदर यात्रा महोत्सवाचा खर्च हिमायतनगर येथील संत साधू महाराजांचे वंशज तुप्तेवार घराणे तसेच परभणी येथील सौ.विमल प्रभाकरराव कोकडवार हे दाम्पत्य मनोभावे सेवा करतात. साधू महाराज भक्तांच्या संकटकाळी धावून येतात अशी भक्तांची धारणा उत्सवा दरम्यान हजारो भक्त गर्दी करतात. .................अनिल मादसवार, संपादक नांदेड न्यूज लाईव्ह

Related Photos