Breaking news

निस्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा

२० डिसेंबर हा दिवस गाडगेबाबा यांचा स्मृतीदिन एकोणिसाव्या शतकात समाजक्रांती करणारे म. ज्योतिबा फुले व त्यांच्या विचाराचा धागा पुढे चालू ठेवणारे विसाव्या शतकातील संत गाडगेबाबा यांनी समाजातील धर्मखाली नावाखाली चाललेल्या अन्याय दुर करण्यासाठी शेवटपर्यंत आपले आयुष्य खर्ची घातले. अंधश्रध्दा, अस्पृश्यता व धर्माच्या नावावर चाललेल्या शोषण या गाडगेबाबांना मोठी चीड होती. संत गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव नावाच्या छोट्यासा खेड्यात झाला. झिंगरणी व सखुबाई हे त्यांचे माता व पिता स्वातंत्र्यपूर्व काळात समाजामध्ये प्रचंड अंधश्रध्दा, निरक्षरता होती. लोक देवी-देवकाच्याखुप करण्यात मग्न होते. त्यांतच त्याला वडिलांना मृत्यु झाला. पती मृत्युनंतर पत्नी सखुबाई डेबू सांगम घेऊन मूर्तीजापूर तालुक्यातील दापूरे नावाच्या गांवी माहेरी राहू लागली श्रमसंस्काराची सूजवन आईकडूनच झालेली असल्यामुळे डेबू गावा तील मुलांसोबत खेळले, जवने यामुळेच त्यांच्यावर सर्वधर्म समभावाची शिकवण झाली. सोबतच्या गोपाला-गोपाला देवकीनंद न गोपाला म्हणजेच गोपाला, बहुजन प्रतिपालक या नात्याने डेबुजीच्या आदर्श होता रक्षक होता. याच कल्पनाद्वारे त्यांनी समाजामध्ये समतावाह रूजविला. पुढे डेबुजी आपला मामाच्या शेतीसाठी रापूर्‍याच्या तीकडे सावकारासोबत केलेला संघर्ष म्हणजेच सावकारशाही विरोधात पुकार देणे बंड होय. पुढे संत गाउगेबाबांनी आपली मुलगी अलोका हिच्या वारश्याच्या कंदोरीसाठी केलेला विरोध ही खरा अंधश्रध्दे विरुध्द उठविलेला आवाज होता. संत गाडगेबाबांनी घरदार लागून बारा वर्षे जागाचे निरीक्षण केले. हातात गाउगे असल्यामुळे त्यांना गाडगेबाबा गाडेगेबुवा लोका म्हणून लागले. समाज प्रबोधन साठी त्यांनी कीर्तन हे माध्यम बनविले. दिवसभर गाव परिसर स्वच्छ करून रात्री त्या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना मनातील घाण स्वच्छ केली. भारतातील अस्वच्छेतेचा संबध हा दारिद्रयाशी लावला जातो. त्यासाठी लागणारी संसाधणे, सफाई यंत्रणा, सोई सुविधांचा अभाव आहे.

भारतात वेगवेगळ्या काळाचे वर्गीकरण हे जात व लिंगभावावर केलेले आहे. सध्या एकीकडे स्वच्छता मोहिम चालू आहे तर दुसरीकडे जातीय खडके उडण आहेत. स्वच्छतेचे मुळ हे जातीय निर्मुलनात आहे. हे आजच्या समाजात ओळखणे पाहिजे. स्वच्छता व अस्पधृश्यता मानवाच्या मनातून निर्घृण जावी, सगळीकउे शिक्षणाचा प्रचार, प्रसार व्हावा या करिता संत गाडगेबाबा यांनी खर्ची केले. राष्ट्रीय व सामाजिक ऐकयासाठी प्रयत्न केले. म्हणूनच त्यांना समतावादी, समाजवादी संत असे सुध्दा म्हटले जाते. त्यांनी दीनदुबळ्यांची सेवा केली. गोरगरीब मुला-मुलींसाठी शिक्षणाची सोय, पशुपक्षासाठी अभय हाच धर्म-समजला, म्हणूनच ते खेद समाजक्रांतीचे अमृ्रदृत, निस्काम कर्मयोगी ठरले. प्रबोधनकार ठाकरे हे बाबाचे डोळस अनुयायी होते. त्यांनी आपला आयुष्यात फक्त दोनच महापुरूषाना श्रध्दास्थानी मानले. एक राजश्री शाहू महाराज आणि दुसरे संत गाडगेबाबा यांना जर नवविचाराशी तरूण पीढी घडवायची असेल तर जनलायक गाडगेबाबाची शिकवण अतिशय उपयुक्त ठरते. एक निरक्षर चिरंगाधारी व्यक्तीने शिक्षणाचा प्रचार प्रसाद करून समाज जागृत केल्या. समाजव्यवस्थेची प्रचंड घडण्यासाठी त्यांनी काठी हाताचं घेतली. सामाजिक विषयांचा मळ काढण्यासाठी हातात खराटा घेतला समाजव्यवस्थेतला विरोध करताना आर्थिक विषमतेवरही कडाडून हल्ला केला.

संत गाडगेबाबा आपल्या आयुष्यात निरक्षरतेचा फार मोठी किंमत मोजली होती. म्हणूनच तयांनी समाजातील तळागळातील लोकांना शिक्षणाचा आग्रह धरला व कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख यांच्या कार्याला हातभार लावला. विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वता व त्याग बाबांना नेहमी आवडायचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी गाडगेबाबाचा सल्ला घेत असत. त्यांच्या शिक्षण संस्थेस बाबानी आपली पंढरपूरची चोखा मेळा धर्मशाळा दिली. संत गाडगेबाबांनी संपूर्ण महाराष्ट्राची शाळा बनूण ग्रामीण भागामध्ये अस्पृश्यता, अंधश्रध्देचे धडे दिले. त्यांनी आपल्या वाणीने श्रीमंत लोकांकडून देणग्या घेऊन गोरगरिबाचाची सोय शिक्षण व वस्तीगृह उभारले. त्यांच्या भर हा गोरक्षणावर होता. बाबा विचारवंत व आचारवंत ही होते. संत तुकारामाच अभंगाद्वारे त्यांनी झोपलेल्या समाजाला जागी केले. दारूबंदी साठी प्रयत्न करणारा समाजसेवक म्हणून ही त्यांची ओळख आहे. लाखो अंध, मुकबधिर लोकांविषयी त्यांच्या मनात तळमळ होती. संत गाउगेबाबांना चांगलीच श्रमशक्ती होती. तल्लख बुद्धीमत्ता व सुक्षम निरीक्षण शक्ती, ग्रहणशक्ती लाभली होती. अध्यात्म व विज्ञान हे जीवनाला पूरक असून समाजसुधारणासाठी उपयुक्त असल्याचे त्यांचे मत होते. जेवणाचे ताट मोडा नवीन विकत धेऊ नका. पण पोरांना शिक्षण शिकवा असे सांगणारे गाडगेबाबा मायबाप मी सडकेवरच्या शाळेत आणि दुनियेच्या विद्यापीठात शिकलो. लोकशिक्षण देणारे आदर्श ग्रामीण विद्यापीठात होय व संत गाडगेबाबा त्यांचे संस्थापक ठरले. खर्‍या अर्थाने आजचे सावकारी प्रतीबंद कायदा, पशुहल्ला, बंदी, हुंडाबंदी, अस्पृश्यता संबधीचे कायदे, शिक्षण हक्क, बडला संबधीचा कायदा, गोहत्या प्रतिबंद, कायदा आणि शंकरपटबंदीचा साठी आवाज उठविणारे संत गाउगेबाबा खरेखुरे क्रांतीचे अग्रदृत होय.

Related Photos