BREAKING NEWS

logo

कंधार, तालुक्यातील मौजे काटकळंबा येथील रहिवाशी काशिनाथ कोळगिरे वय 58 वर्ष व्यवसाय शेती हे कर्जबाजारी झाल्याकारणाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इच्छा मरणाची परवानगी द्यावी असा पत्रव्यवहार करून, दि.2 जुलै रोजी आपली जीवन यात्रा संपविली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एकीकडे सरकार ने कर्जमाफी केल्याचे आश्वासन देऊन सुद्धा अद्याप कसल्याच प्रकारची कर्जमाफी झाली नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे संसार कर्ज काढून रस्त्यावर आल्याचे चित्र संबंध महाराष्ट्रात उभे आहे. यातच मौजे कंधार तालुक्यातील काटकळंबा या गावातील मयत शेतकरी काशिनाथ कोळगिरे वय 58 वर्ष हे कर्ज बाजारी झालेले होते. सावकारी कर्ज व पीक कर्ज काढून बँकेच्या व खासजी कर्जास कंटाळून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कर्ज बाजारी झाल्याकारणाने इच्छा मरण मागुन जीवन यात्रा संपविली आहे. यामुळे तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली असून, या घटनेनंतर प्रत्येक स्तरातून शासनाच्या चालढकल पणाचा निषेध केल्या जात आहे.

कोळगीरे यांच्या सह काटकळंबा येथील अन्य शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरणे आमचा गुन्हा आहे का ? आम्हाला कर्ज माफी नसेल तर स्वईच्छेने मरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दि. 29 जून रोजी केली होती. मुख्यमंत्री यांच्याकडे फॅक्सही करण्यात आला. यावेळी काटकळंबा येथील 40 शेतकऱ्यांनी चालु कर्ज न भरण्याची शपथ घेतली होती. कर्जमाफी नाहीच तर नाही मागील काळातील बँकेच्या कर्जाचे डोंगर, चालु हंगामात खरीप पेरणी करूनही पाऊस नाही. यासर्व पार्श्वभूमीवर मुलीचे लग्न कसे करावे या विचाराने कोळगीरे यांना घेरले होते. यातुन त्यांनी घरातच गळफास लावुन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच काटकळंबा येथील ग्रामस्थांनी कोळगीरे यांना नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली असा परिवार आहे.

    Tags