BREAKING NEWS

logo

कंधार, नगराध्यक्ष यांचा मनमानी कारभार चालत असून यांच्या कारभाराचा लेखाझोका शासन दरबारी मांडला आसून लवकरच नगराध्यक्षा पदावरुन पायउतार होणार आहेत त्यामुळे कंधार नगर पालीकेच्या नगराध्यक्ष पदाची लवकरच निवडणुक लागणार असल्याचा दावा माजी नगरसेवक कृण्णा पापीनवार यांनी  पञकार  परिषेदे बोलताना केला आहे.  

स्विकृत सदसच्या निवडणुकी वरुन कंधार न.पा चे राजकारण तापले असून अरविंदराव नळगे यांच्या अरोपाला प्रतिउत्तर देण्यासाठी दिनांक 1-7-2017 रोजी माजी नगरसेवक कृष्णा पापीनवार यांनी आ.प्रताप पा.चिखलीकर यांच्या साई सदन यावर पञकार परिषेद घेऊन अरोपाचे खडण करण्यात आले. या पञकार परिषेदेला ता.प्रमुख भगवान राठोड, शहर प्रमुख बाळु महाजन  माजी नगरसेवक गणेश कुंटेवार, नगरसेवक सुनिल कांबळे,मधुकर डांगे, उपस्थीत होते. यावेळी कृष्णा पापीनवार पञकाराशी बोलताना म्हणाले की, नळगे हे सुडबुध्दीचे राजकारण करत आहेत. उपजिल्हाधिकारी यांनी स्विकृत सदस्या साठी माझ्या नावाची शिफारस केली आसताना त्या नावाला विरोध केला म्हणून मी शासनाकडे दाद मागीतली आहे. कायदा कोणाच्या बापाचा नाही याची मला जाणीव आहे. शासनाने सर्व कागदपञे पाहुनच नळगे यांना नोटीस दिली आहे. केवळ कृष्णा पापीनवार न.पा.च्या सभागृहात जाऊ नये म्हणून हा सर्व खटाटोप चालु आहे. या प्रकरणात आमदार प्रताप पा.चिखलीकर यांचा काही संबध नसून त्याचे नाव घेवून नळगे त्यांना बदनाम करत आहेत. शिवसेनेचे नगरसेवक कधिच विकास कामाला विरोध करत नाहीत. सौ.अनुसया केंद्रे या नगराध्यक्षा आसताना आ.प्रताप पा.चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी विस कोटी रुपयाचा निधी मंजुर करुन घेऊन कामे केलीच ना. अरविंद नळगे हे शहरातले मोठे नेते म्हणून ओळखल्या जाते माञ शहराचा विकास कसा करावा याचा अभ्यास त्यांना नाही. पुर्वी जे काही कामे झाली या पाठीमागे कै.बालु सावकार श्रीनिवास यांचा हाथ आहे. तेच नळगे यांचे राजकीय गुरु आहेत. 

"पाच वर्ष नगराध्यक्ष आमचाच राहणार. हुकमाचा एक्का माझ्याकडे आहे".अशा पोकळ घोषणा करणाऱ्यानी आमच्या नादी लागु नये तुमच्याकडे हुकमाचा एकच एका आसेल परंतु आमच्याकडे चार हुकमाचे एक्के आहेत. त्यामुळे तुमच्याकडे असलेला हुकमाचा एक्का लवकरच छक्का होणार असल्याची टिका श्री पापीनवार यांनी केली चांगल्या कामाला कधीही शिवसेनेच्या नगरसेवकाचा पांठीबा असेल नको त्या कामावर षैसा उधळपट्टी करत असतील तर आमचे नगरसेवक विरोधच करतील. अशोकराव चव्हाण यांना खुश करण्यासाठी आ.प्रताप पा.चिखलीकर यांना शिवा देण्याचा खाटाटोप चालु आहे .अशाने कंधार शहराचा विकास होणार नाही.आजही आमदार साहेबांनी मंजुर केलेले चार पाच कोटी रुपये पडुन आहेत याचा वापर कसा करावा हे सुध्दा नळगे यांना कळत नाही.केवळ शहरातील लोकांना वेटीस धरुन राजकारण करणे हाच उदेश त्यांचा आहे.आपलीच मनमानी चालवत आसल्यानेच मार्केट पडले आहे. आजही कोणत्याच नगारसेवकाना विश्वासात न घेता आपलीच हुकुमशाही चालवत आहेत. एवढेच नव्हे तर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला पण माणत नाहीत हे नगराध्यक्ष पदाला शोभण्यासारखे नाही. त्यामुळे नगराध्यक्षाच्या मनमानी कारभाराची तक्रार शासनाकडे कायद्याला धरुन  रितसर केली आहे. याची दखल घेवून नगराध्यक्ष यांना पदावरुन का हटवण्यात येवू नये  या संदर्भात नोटीस पण आली आहे. येणाऱ्या सहा महिन्यात नगराध्यक्ष पदासाठी पोट निवडाणुक होणार असल्याचा दावा कृष्णा पापीनवार यांनी  पञकार परिषेदे मध्ये बोलताना केले.

    Tags