BREAKING NEWS

logo

कंधार, नागरिकांनी आपल्या गावामध्ये मोठ्याप्रमाणावर वृक्ष लागवड करावी ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल असे प्रतिपादन माजी जि.प.सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर चार कोटी वृक्ष लागवड सप्ताह अंतर्गत सोमठणा तालुका कंधार येथे अंगणवाडी ग्रा.प.परिसर वृक्षलागवड कार्यक्रमा प्रसंगी बोलताना केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षा सरपंच सौ.धोंडूबाई गित्ते प्रमुखपाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर, हणमंतराव पेठकर,दैठणा चे सरपंच प्रभाकर आनकाडे,रामभाऊ आनकाडे,भानुदास गित्ते, बालाजी पाटील होणराव,किशन महाराज चोंढे,गुणाजी पाटील आनकाडे, पंडितराव केंद्रे,पो.पा.संग्राम गित्ते,ज्ञानोबा वाघमारे, अनतेश्वर गित्ते ई.उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमचे पुजन व अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना सौ.भोसीकर म्हणाल्या की,दिवसेंदिवस होत असलेल्या कत्तलीमुळे पर्यावरणाची ऱ्हास होत आहे.त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी व अवेळी होत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत वृक्षांची होत असलेली कमी संख्या मानवासाठी घातक आहे. पर्यावरणाच्या समतोलासाठी गावातील नागरिकांनी पुढाकार घेऊन मोठ्याप्रमाणावर वृक्ष लागवड करावी असे आवाहन ही यावेळी बोलताना त्यांनी केले.याप्रसंगी संजय भोसीकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करण्यात आला व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी अंगणवाडीतील बालकांना सौ.भोसीकर यांच्या हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रामभाऊ आनकाडे यांनी केले या कार्यक्रमास गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

    Tags