BREAKING NEWS

logo

कंधार, तालुक्यातील सावरगाव निपाणी यागावी दि.30/07/2014 रोजी येथील रहिवासी मिनाबाई संतोष सोनकांबळे हिला तीचा पती संतोष हौसजी सोनकांबळे यानें चारित्र्यावर संशय घेऊन अंगावर रॉकेल टाकून जाळून मारल्याची घटना घडली होती या सदरील प्रकरणात मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र काकाणी यांनी आज दि.4 जुलै रोजी आरोपीस दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
 
याबाबत सविस्तर माहिती अशी की कंधार तालुक्यातील सावरगाव निपाणी यागावी दि.30/07/2014 रोजी येथील रहिवासी मिनाबाई संतोष सोनकांबळे हिला तीचा पती संतोष हौसजी सोनकांबळे यानें चारित्र्यावर संशय घेऊन तसेच दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणुन तिच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून मारले मयत मिनाबाई संतोष सोनकांबळे हिच्या मृत्यूपूर्वी जबाबा वरून पोलीस स्टेशन कंधार यांनी आरोपी संतोष सोनकांबळे यांच्या विरुद्ध गुन्हा क्र.125/2014 दाखल करून पूर्ण तपासा अंती दि.29/10/2014 रोजी आरोपी विरुद्ध दोषारोप पाठवण्यात आले. सदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले या प्रकरणात मयत मिनाबाई संतोष सोनकांबळे हिच्या मृत्यूपूर्वी जबाबा वरून मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र काकाणी यांनी आज दि.4 जुलै रोजी आरोपीस दहा वर्षाची सक्त मजुरी शिक्षा सुनावली व रु.5,000/ दंड लावला.वरील प्रकरणात सरकार पक्षाची बाजु अति.सरकारी वकील नीरज कोळनुरकर यांनी मांडली व त्यांना पो.को,क्षीरसागर,केंद्रे व तरटे यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात मांडले आहे.

    Tags