BREAKING NEWS

logo

कंधार, मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या दि.6 जुन 2017 रोजी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी नागोराव देशपांडे,उपाध्यक्ष पदी वसंतराव नागदे तर सचिव पदी मा.आ.ईश्वरराव भोसीकर यांची बिनविरोध निवड झाली.

गेल्या अनेक वर्षांपासून माजी आमदार ईश्वरराव भोसीकर स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या मराठवाडा खादी समितीचा कारभार अत्यंत कुशलतेने सांभाळत असून खादी ग्रामोद्योग समिती त्यांच्या काळात भरभराटीचे स्वरूप आले खादी समितीचा सन्मान व कार्य भोसीकरांनी देशपातळीवर नेण्याचे काम केले या समितीच्या कार्याचा व त्यांचा गौरव महामहिम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन 2012 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार,देऊन गौरवण्यात आले.तसेच सन 2016 मध्ये राष्ट्रीय पातळीवरचा सर्वत्कृष्ठ खादी पुरस्कार,माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या खदी समितीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या दिनकरराव बोरीकर, विश्वस्त संचालक बाबासाहेब चारठाणकार,सुरेश कुलकर्णी,प्रभाकर चौधरी,दिगंबर देशमुख, शिवसांब चवंडा, वसंत नागदे,राजेश्वर स्वामी,महाबळेश्वर मठपती, रघुनाथ पोतदार,शकुंतला सोळुंके,चंद्रकांत कापसे, माडीवाळअपा उटगे,डॉ.हंसराज वैध यांची निवड झाली.यामधून अध्यक्ष पदी अध्यक्षपदी नागोराव देशपांडे,उपाध्यक्ष पदी वसंतराव नागदे तर सचिव पदी मा.आ.ईश्वरराव भोसीकर यांची बिनविरोध निवड झाली. आगामी काळामध्ये संस्थेची भरभराट व खादी ग्रामोद्योगाचे कार्य ग्रामीण भागात पोहचवण्याचा मानस त्यांनी सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने करण्याचा व्यक्त केला.

    Tags