BREAKING NEWS

logo

कंधार, काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रातुन कंधारच्या नगराध्यक्षा व माजी नगराध्यक्ष श्री अरविंदराव नळगे यांच्या बाबतीत  एक्का व छक्क्याच्या गोष्टी स्वत: गुलाम असणा-यांनी करू नयेत,अशी सनसनाटी टिका माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक सुधाकर व कांबळे यांनी दि.८ रोजी पत्रकार परिषदेत केली.

दि.८ जुलै रोजी दुपारी २वाजता शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत असताना पुढे म्हणाले की,कंधार नगरपालिकेच्या स्विकृत सदस्यसाठी​नगराध्यक्षा तथा पिटासीन अधिकारी यांनी जो निर्णय दिला तो कागदपत्रे तपासूनच दिला.स्विकृत सदस्य पदासाठी कृष्णा पापीनवार यांनी जी कागदपत्रे सादर केली होती,ती खोटी असल्याचे सर्व पुरावे शहाजी नळगे यांनी सभागृहात दाखल केली होती,ती कागदपत्रे तपासूनच त्यांनी हा निर्णय दिला.त्यांना हा निर्णय मान्य नसल्यास त्यांनी निर्णयाविरुद्ध कलम २१अन्वये न्यायालयात दाद मागयला पाहिजे होती, परंतु स्वत:ते कागदपत्रे खोटे आहेत हे माहित असल्यामुळे न्यायालयात न जाता सुडबुध्दीने शासनाकडे जावुन सत्तेचा गैरवापर करुन आमदारामार्फत नगराध्यक्षावर कारणे दाखवा नोटीस आणली. कृष्णा पापीनवार यांनी जो पैसा कमावला आहे तो नगरपालीकेत दलाली करुन व आमदारांची मुनिमकी करुनच कमावला, नगरपालीकेची दलाली बंद झाल्यामुळे त्यांचा थयथयाट सुरू आहे.साधा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्यांचा व्यवसाय काय आहे? त्यांच्याकडे गुंठाभर सुध्दा जमीन नाही,तर त्यांचा उदरनिर्वाह कसा चालतो यांचा जनतेनी विचार करावा.

कंधार शहरातील दोन्ही शॉपिंग सेंटर व स्मशानभूमी ही नळगे साहेब नगराध्यक्ष असतांना इ.स.१९९३-९४ घ्या काळात झाली आहे.त्यावेळी कृष्णा पापीनवार नळगे व साहेब यांची साधी ओळखसुध्दा नव्हती व ती संकल्पना नळगे साहेबांना मी दिली असे म्हणत अकलेचे तारे तोडले आहेत. नळगे साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदीं असतांना शॉपिंग सेंटर उभारले व कंधारच्या वैभवाचा तुरा रोवला. विकासाची दृष्टी केवळ नळगे साहेबांकडेच आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहोत. सिध्दार्थ नगर मधील जो रस्ता आहे तो करतेवेळी आम्ही सांगीतले होते की रस्त्यातील लाईटचे पोल व  डी.पी.बाजुला करा व मगच रस्ता करा.परंतु नगरपालीकेची निवडणूक लागल्याने सत्ता आली नाही तर आपली दलाली जाते यामुळे रस्त्यातच लाईटचे पोल व डी.पी.ठेवुन तसाच रस्ता केला ही यांची विकासाची दृष्टी आहे. जो माणूस पैशासाठी काहीही करतो.दुस-याचा गुलाम होतो त्यांनी एक्क्याची व छक्क्याची भाषा करू नये. जनतेनी अशा खोटारड्या माणसावर विश्वास ठेवु नये व पासुन आमदारानेही सावध रहावे. पापीनवार हे रोहिदास चव्हाण शिवसेनेचे आमदार होते तेंव्हा त्यांच्या सोबत राहुनच त्यांना धोका दिला, रोहिदास चव्हाणांना सोडून प्रताप पाटील यांच्याकडे गेला.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रताप पाटील यांचा पराभव झाला.पुन्हा त्यांना धोका देवून नळगे साहेबांकडे आला, नळगे साहेबांना सुध्दा धोका दिला. नळगे साहेबांकडून पुन्हा प्रताप पाटील यांच्याकडे गेला, परंतु प्रताप पाटील यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर त्यांनापण पुन्हा सोडणार, त्याला केवळ सत्ता पाहिजे.या बैमानाची चारही दरवाजे बंद झाले आहेत.असा विश्वास माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुधाकर मरिबा कांबळे व्यक्त केला.यावेळी  नगरसेवक मन्नान चौधरी, सौ.लक्ष्मीबाई रामराम पवार, सौ.ज्योती नळगे,शहाजी नळगे, स्विकृत सदस्य डॉ.दीपक बनवणे, भगवान जाधव, सुरेश राठोड,बंडु कांबळे, सुभाष कांबळे,बालाजी बडवणे,शिवाजी पवार,नागेश पवार, बालाजी पवार आदींची ​उपस्थिती होती.

    Tags