logo

नांदेड, वृक्ष तोडीमूळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे यासाठी वृक्षाची लागवड करून त्याचे संगेापन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्री रामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालयाचे मूख्याध्यापक मूरलीधर पाटील यांनी केले आहे. 

राज्य शासनाने 1 ते 7 जूलै या कालावधीत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत येथील श्री रामप्रताप मालपाणी मूकबधीर विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपन करण्यात आले यावेळी मूख्याध्यापक पाटील बोलत होते. यावेळी शाळेचे वसतीगृह प्रमूख संजय शिंदे, विठ्ठल लाठकर, धनंजय बेलोकर, राज सोनाळे,साईनाथ इप्तेकर, भुजंग आवटे, शशिकांत पांपटवार, तिरूपती पवार, गोरखनाथ कदम आदी शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आदींची उपस्थिती होती. यावेळी पाटील म्हणाले की, पर्यावरणाचे असंतूलन, वाढते प्रदुषण रोखण्यासाठी वृक्ष लावणे आवश्यक आहे. काही ठिकाणी वृक्षाची लागवड करण्यात येते मात्र त्याचे संगोपण करण्यात येत नाही यामूळे वृक्ष जगत नाहीत यासाठी लागवडी सोबतच संगोपन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले.

    Tags