logo

कंधार, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव 2017 कंधार ची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली असुन अध्यक्ष म्हणून  मारोती गायकवाड यांची तर उपाध्यक्ष म्हणून गंगाधर गोपीनाथ कांबळे, संदिप गायकवाड आणि सचिव म्हणून सतिश मल्हारराव वाघमारे यांची बीनवीरोध निवड करण्यात आली.

दि.९ रोजी कंधार येथिल शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवानिमित्य विविध कार्यक्रम बाबत चर्चा करण्यात आली व खेळीमेळीच्या वातावरणात कार्यकारणी जाहीर करण्यात आले. त्यामध्ये अध्यक्ष ;मारोती गायकवाड ,उपाध्यक्ष ;गंगाधर  कांबळे, संदिप गायकवाड , सचिव ;सतिश  वाघमारे ,सहसचिव:- जनार्धन कांबळे,साईनाथ  मळगे.कोषाध्यक्ष:- महेंद्र  कांबळे. सहकोषाध्यक्ष:- किशोर  बारूळकर.यांची बिनविरोध निवड केले. यावेळी मातंग समाज सेवा समितीचे  संस्थापक - अध्यक्ष बापुराव वाघमारे , शिक्षक नेते एन.एम.वाघमारे,सोपान कांबळे,पेन्टर सदाशिव गायकवाड ,कैलास नवघरे ,राजु मळगे, धनाजी वाघमारे,अमर बसवंते,अशोक गडंबे,माजी सैनिक बालाजी वाघमारे,रोशन जाधव,विकास कांबळे, निरंजन वाघमारे,बालाजी कांबळे,कैलास कांबळे, पदमाकर बसवंते,आदीसह  समाज बांधवाची यावेळी उपस्थिती होती.

    Tags