logo

नांदेड, माणसाच्या अंगी असलेल्या भावा भिव्यक्तीला कवितेच्या माध्यमातून प्रकट होता येते. कविता लिहिणे व सादर करणे यापेक्षा ती जगणे अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन युवा साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी काव्य पौर्णिमा या कार्यक्रमात केले. यावेळी सुदर्शन चौकी, सचिन दुर्गम, अक्षरोदयचे राज्याध्यक्ष दिपक सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पांडूरंग कोकुलवार हे होते.

अक्षरोदय साहित्य मंडळाच्यावतीने शहरातील गंगाचाळ येथील मार्कण्डेय ऋषी मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त काव्य पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना ढवळे म्हणाले की, आजची पौर्णिमा ही आषाढी गुरुपौर्णिमा व व्यास पौर्णिमा म्हणूनही साजरी केल्या जाते. त्यानिमित्ताने जो वृक्ष लागवडीचा कार्यक्रमघेण्यात आला. तसे अनेक मानवहितकारी उपक्रमअक्षरोदय कडून राबविण्यात येत आहे. कविता जगण्याची भाषा प्रत्यक्ष कृतीत उतरवून वृक्ष संवर्धनाचीही जबाबदारी अक्षरोदयने घेतली आहे. पद्मशाली समाज सेवा संघाच्या हस्ते वृक्षारोपण करुन काव्य पौर्णिमेचे उद्घाटन करण्यात आले. त्यात सहभागी कवी गजेंद्र कपाटे- आधुनिक अभंग, शरदचंद्र हयातनगरकर-विविधांगी गुरुदेवता, मोहनराव कुंटूरकर- गुरुदक्षिणा, गंगाधर ढवळे- गुरुवर तुम्हे मैं, शैलेश कवठेकर-मानवतेचे गुरु, गोविंद बामणे-कोंडमारा, मोहन बुक्तरे-सुगंध, अशोक भुरे-आई माझा गुरु, उषाताई ठाकूर-शिव मेरे, सदानंद सपकाळे- नमन तुझे गुरुवर, चंद्रकांत चव्हाण-नशापाण, रामकृष्ण कुर्‍हे- नास्तिक, एन.सी. भंडारे- जगणे कठीण झाले, मारोती मुंडे- तडफड या मनाची, व्यंकटेश कंडारकर- गुरु चरणाने, सुमेध घुगरे- गुरुजी तुमच्यामुळे, दिपक सपकाळे-क्रांती नवी, पांडूरंग कोकुलवार- मार्कण्डेयाची कथा अशा एकापेक्षा एक सुरेल व सरस कविता सादर केल्या. सादर कवितांवर एकमेकांच्या कोटींनी रंगत आणली.दरम्यान, अभिरुची गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पांडूरंग कोकुलवार यांचा मंदिर ट्रस्टच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला. काव्य पौर्णिमेचे बहारदार सूत्रसंचलन अनुरत्न वाघमारे यांनी केले तर आभार व्यंकटेश कंडारकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लच्छमन कमली, रामकृष्ण कुर्य, सुगना कैरमकोंडा, विनय कैरमकोंडा, श्रीशैलमकुचम, सुमेध चौदंते आदींनी परिश्रम घेतले.

अक्षरोदयकडून वृक्षारोपण व संवर्धन
वन विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मार्कण्डेय मंदिर परिसरात अक्षरोदय साहित्य मंडळाकडून वृक्षारोपण करण्यात आले. त्यात सतपर्णी, करंजी, सिताफळ, अशोका, गुलमोहर, निलगीरी तसेच अनेक छायादार वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्ष संवर्धनाची जबाबदारी निश्चित करण्यात येऊन शतकोटी वृक्ष लागवड प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी सुदर्शन चौकी, पेंन्टय्या स्वामी बुरला, जक्काबालचंद्रमपुरोहित, कोंडा रामलू स्वामी, श्रीनिवास कैरमकोंडा, बालकिशन उप्परपेल्ली, राघवेंद्र बोटला, कंटेश्यामबुरला, नागभूषण दुर्गम, अन्नमवार, बुसा गणेश आदींची उपस्थिती होती.   

    Tags