logo

कंधार, देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त कंधार तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा चिखलभोसी येथील विध्यार्थ्यांना माजी जि. प. सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष शिवहार किडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर,पानभोसीच्या सरपंच सौ.सुवर्णा नाईकवाडे, हणमंतराव पेठकर, चिखलभोसीचे सरपंच भगवानराव वरपडे, नारायण वरपडे माजी सरपंच, चेरमन हरिभाऊ किडे, संभाजी कांबळे, उपसरपंच वसंतराव किडे, रामभाऊ किडे, माणिकराव वरपडे, शंकर पाटील वरपडे,हरिभाऊ नाईकवाडे,गजानन नाईक,मु.अ.एस.एस.तेललवार, प्रभाकर भोसीकर, बाबुराव किडे हे होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.शालेय समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक एस.एस.तेललवार यांनी केले. यावेळी बोलताना सौ.भोसीकर म्हणाल्या की,डॉ.शंकरराव चव्हाण हे मराठवाड्यासाठी आधुनिक भगीरथ होते त्यांच्या काळातील जायकवाडी व विष्णुपुरी सारखे जलसिंचनासाठी अनेक महत्वाचे प्रकल्प उभारले.त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील. शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौ.भोसीकर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून यश संपादन करावे, यासाठी नियमित शाळेत यावे तसेच शिक्षकांनी विद्यार्त्यांच्या गुणवत्ता वाडीकडे लक्षद्यावे व पालक मेळाव्याचे आयोजन करावे. याप्रसंगी संजय भोसीकर यांनी डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला.शिवहार किडे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.शाळेच्या प्रांगणात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांचाळ सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सरपंच भगवानराव वरपडे यांनी केले. यावेळी सटवा किडे,सुरणर सर, देवराव किडे,तिरुपती वरपडे,तुतूरवाड सर,भोसीकर मॅडम,प्रल्हाद वरपडे आदींची उपस्थिती होती.

    Tags