BREAKING NEWS

logo

नांदेड (एनएनएल) फसवी कर्जमाफी, शेतीमालाला नसलेला भाव, शेती व शेतकरी विरोधी असलेले सरकारी धोरण यामुळे सरकारने कुठल्याही अटी व शर्ती शिवाय निकष न लावता कर्जमाफी करावी. सर्व शेती उत्पादनाला कायद्याने योग्य भावाची हमी द्यावी, जमीनीच्या बाजार भावाईतका कर्जपुरवठा करावा, शेतकरी शेतमजुरांना कायद्याने आर्थीक, सामाजीक सुरक्षा द्यावी, तरुणांना काम मिळेपर्यंत मानधन द्यावे, या मागण्यांसाठी राज्यात दि 2 आॅक्टोबर पासुन शेतकरी सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन करणार आहेत. त्या अगोदर दि 9 आॅगष्ट पासुन राज्यात वर्धा सेवाग्राम ते नाशिक शेतकरी शेतमजुर सुरक्षा अभियान राबवण्यात येणार असल्याची घोषणा माजी आमदार तथा किसान मंच चे निमंत्रक शंकर आण्णा धोंडगे यांनी केली ते नांदेड येथे आयोजीत किसान मंच च्या बैठकीत बोलत होते.

यावेळी बैठकीला सिताराम मोरे, दत्ता पवार, अशोकराव लोंढे,माजी उपाध्यक्ष दिलीप धोंडगे,माजी सभापती संजय कर्हाळे, माजी जि प सदस्य मारोतराव कवळे, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत सुगावे, गोपाळ पाटील ईजळीकर, आर पी कदम, विठ्ठल जाधव, हानमंत मिनके, दत्तराव सुकळकर, विश्वांभर मसलगेकर, सदाशिव पाटील, प्रभाकर आढाव, बाबुराव केंद्रे,आदी उपस्थीत होते.  पुढे बोलताना ते म्हणाले केंद्राच्या व राज्याच्या सरकारचे धोरण शेतकर्यांच्या विरोधात असुन सरकार उद्योगपतींचे, व्यवसायीकांचे 16 लाख कोटी रुपये एनपीए च्या व दिवाळखोरीच्या आधारे राईट आॅफ करता येतात तर सर्वांचे पोषण करणार्या शेतकर्यांचे केवळ काही हजार कोटीचे कर्ज माफ का करता येऊ नये. असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थीत केला.यावेळी बैठकीत सन 2017 पर्यंतचे कोणत्याही अटी शर्ती, निकष न लावता शेतकर्यांची संपुर्ण कर्ज मुक्तता करण्यात यावी, हमी भावापेक्षा बाजार भाव कमी झाल्यास फरकाची रक्कम थेट शेतकर्यांना देण्यात यावी, शेतकर्यांना जमीनीच्या मुल्यांकनाच्या (रेडीरेकनर ) च्या 70/ कर्ज देण्यात यावे, शेतकरी -शेतमजुरांना आर्थीक, सामाजीक, सुरक्षा कायदा करुन त्यांचे उत्पन्न किमान चतुर्थ श्रेणीच्या कर्मचार्या ईतके सुरक्षीत करावे, तरुणांना काम मिळेपर्यंत किमान जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी मानधन द्यावे असे पाच ठराव मांडुन सरकारकडे मागण्या केल्या आहेत.  

या मागण्या सरकारने मान्य कराव्यात अन्यथा राज्यभर दोन आॅक्टोबर पासुन राज्यभर सरकारच्या विरोधात शेतकरी शेतमजुर असहकार आंदोलन करण्यात येणार असुन सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी दि 9 आॅगष्ट पासुन सेवाग्राम वर्धा ते 2 आॅक्टोबर नाशिक पर्यंत शेतकरी शेतमजुर सुरक्षा अभियान राज्यभर राबण्यात येणार आहे या अभियाना अंतर्गत दोन हजार गावात शेतकरी शेतमजुरांच्या सभा आयोजीत करण्यात येऊन त्याचा समारोप नाशिक येथे होणार असल्याची माहीती यावेळी त्यांनी दिली.या आंदोलनात पक्ष, जात, धर्म बाजुला सारुन सहभागी व्हावे व आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी बैठकीला मोठ्या प्रमाणावर जिल्हाभरातुन शेतकरी उपस्थीत होते यावेळी शेतकर्यांनी सुचना केल्या दुध, पाणी, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा, बंद करावा अशा सुचना शेतकर्यांनी मांडल्या. यावेळी संतोष केंद्रे, दत्ता कारामुंगे, बाबासाहेब देशमुख, तुकाराम मोरे, व्यंकटराव माने, गौतम पवार, अमोल देशमुख, दत्ता तळणीकर, संजय वडवळे, माधव कांबळे, व्यंकट भालेराव, सोपान महाराज, आत्माराम महाराज पोले, यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थीत होते. सुत्रसंचलन शाहीर गौतम पवार यांनी केले. 

    Tags