logo

BREAKING NEWS

फुलवळ येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहाचे

सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते लोकार्पण

कंधार, तालुक्यातील फुलवळ येथे गेल्या साठे जयंती कार्यक्रम प्रसंगी सौ.वर्षाताई भोसीकर यांनी येणाऱ्या साठेजयंती पर्यंत अपुर्ण असलेल्या या सभागृहाचे काम पुर्ण करू असा फुलवळवासीयांना शब्द दिला होता . त्याच शब्दाला स्मरण ठेऊन त्यांनी स्थानिक निधीतून दोन लक्ष रूपये येथील सभागृहासाठी दिले त्यातत उभारलेल्या भव्य वास्तुचा दि.13 मे रोजी माजी जि.प.सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालाजी देवकांबळे होते तर उदघाटक म्हणून माजी जि.प.सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर , प्रमुख पाहूणे म्हणून कॉंग्रेस चे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, हणमंत पा.पेठकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष डी.टी. मंगनाळे , माजी सरपंच शिवहार मंगनाळे, ग्रामविकास अधिकारी बालाजी भायेगावे, बसवेश्वर मंगनाळे, खमरोद्दीन बिच्छु, पो. पा.इरबा देवकांबळे, ग्रा.पं. सदस्य गंगाधर शेळगावे, दयानंद रासवते, वत्सलाबाई बसवंते, नागेश सादलापूरे, महेश मंगनाळे आदिंची प्रमुख उपस्थिती होती .

कार्यक्रमाच्या सुरूवातीला सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते  फित कापून सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले . तद्नंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पुजन करून या महापुरूषांना अभिवादन करण्यात आले. फुलवळवासीयांकडून उपस्थित मान्यवरांचा यथोचीत सत्कारही करण्यात आला. यावेळी पुढे बोलतांना सौ.वर्षाताई भोसीकर म्हणाल्या की आजपर्यंत ही आपण विकासकामात भेदभाव केला नसून वस्ती कोणताही असो तेथे जमेल तसा निधी देऊन विकास कामे करण्यासाठीच प्राधान्यांने न्याय दिला . आणी विशेष करून दिलेला शब्द पाळला . कारण गेल्या 26 ऑगस्ट रोजी फुलवळ येथील साठे जयंती च्या कार्यक्रमात आपण हजर नसताना ही फोन वरून जयंती ला शुभेच्छा देऊन येथील विकासासाठी दोन लक्ष रूपये निधी जाहीर केला होता . त्याप्रमाणे तो निधी दिला आणी त्यातूनच हे भव्य सभागृह उभारले . या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहाचे लोकार्पण आपल्या हातून करतांना मनापासून आनंद होत आहे .

गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आपण सर्वांना समान न्याय देत विकास निधी खेचून आणुन केलेल्या विविध विकास कामांचा आढावा यावेळी मांडत सध्या आपण सत्येत नसलो तरी सामाजिक भावना जपत विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकहीतांची कामे करत आपली लोकचळवळ पुन्हा सुरु ठेवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. संजय भोसीकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले की भोसीकर परिवाराची आणी फुलवळची नाळ अतुट आहे.त्यामुळे आम्ही फुलवळकरांना कधीच विसरणार आणी वा-यावर सोडणार नाही .तेव्हा यापुढेही जमेल त्या पध्दतीने जमेल तेथून विकास निधी खेचून आणु आणि फुलवळच्या उर्वरीत विकासाला चालणा देऊ. प्रास्तावीक सरपंच बालाजी देवकांबळे यांनी केले, यावेळी डी.टी.मंगनाळे , धोंडीबा बोरगावे, बसवेश्वर मंगनाळे यांनीही मनोगत मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार पत्रकार विश्वंभर बसवंते यांनी केले. यावेळी गंगाधर देवकांबळे, गंपू बसवंते, श्यामराव बसवंते, भागीरथबाई बसवंते, मथुराबाई बसवंते, दूधकावडे , बसवंते, देवकांबळे यांच्या सह गावकरी पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Tags