logo

BREAKING NEWS

नापिकी व कर्जास कंटाळून शेतकऱ्याने घेतला गळफास

कंधार तालुक्यातील मौजे बामणी येथील घटना

कंधार, तालुक्यातील मौजे बामणी(प.कं)येथील एका 48 वर्षीय ईसमाची सततच्या नापिकीस व कर्जास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि.15 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर माहिती असी की मौजे बामणी(प.कं)येथील शेतकरी दत्ता दशरथ कदम वय 48 वर्ष व्यवसाय शेती ह्यांनी सततच्या नापिकीस व मागच्या वर्षी झालेल्या मुलीच्या लग्नास घेतलेल्या बँकेच्या व सावकारी कर्जास कंटाळून स्वतःच्या शेतात सकाळी सहा वाजताच्या सुमारास गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली सकाळी चारा घेऊन येतो असे म्हणुन शेताकडे दोरी घेऊन गेले होते.बराच वेळ घरी परत न आल्याने त्यांचे मोठे बंधु रामकीशन दशरथ कदम हे शेताकडे चारा आणण्यासाठी गेले तर त्यांच्या निदर्शनास दत्ता यांनी फाशी घेतल्याचे आढळून आले. घडलेला प्रकार त्यांनी गावातील लोकांना सांगुन शेतात घेऊन गेल्याचे मयत शेतकऱ्याचा पुतण्या विश्वनाथ कदम यांनी मीडियाशी बोलतांना दिली. शेतकऱ्याच्या पाश्चात दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे बामणी गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच उस्मानगर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मयताचे प्रेत येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.  

    Tags