logo

BREAKING NEWS

कंधारचे बि.डि.ओ.किरण सायमोतेना तडजोडीअंती दीड हजाराची लाच घेताना अटक

कंधार, कंधार पंचायत समीतीचे गट विकास अधिकारी किरण सायमोते हे विविध कामातुन छूप्प्या पध्दतीने कामाच्या बदल्यात पैसे घेत आसल्याचे अनेक जनाकडून बोलल्या जात होते. याची चर्चा सुरु असतानाच दि. १८ मे रोजी सायंकाळी ०८ वाजेच्या दरम्यान लाचलुप पथकाने त्यांच्यावर लाच स्वीकारताना छापा रंगेहात पकडले. २ हजाराच्या लाचेची मागणी केल्यानंतर दिड हजार रुपयावर तडजोड करून लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केल्याने अधिकारी - कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. 

या विषयी सविस्तर माहिती अशी की १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून हाळदा तांडा येथील जंगदबा माता मंदिराच्या कंपाऊन्ड वाल बांधकामाचे बिल काढण्यासाठी राक्षसमारे यांच्याकडे दिडा हजार रुपयाची मागणी केली होती. या गावातील काही लोकांनी लाचलुप पथकाकरे सदरील प्रकाराची तक्रार    केली, यावरुन या पथकाकडून सापळा रचण्यात आला. सायंकाळी सहा वाजता कार्यालयाचा वेळ संपला असतानाही दिडा हजार रुपये घेण्यासाठी किरण सायमोते हे कार्यालयातच बसून होते. आठ वाजेच्या सुमारास दिड हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने बीडीओ सायमोतेला रंगेहात पकडले. या पथकात डी.वाय.एस.पी.माणिक बेंद्रे, पि.आय.अशोक गित्ते, ना.पो.काॕ.शेखा चाँद, अमरजित चौधरी, गणेश ताटीकोंडलवाड आदीचा सहभाग होता. वृत्त लिहिपर्यंत येथील पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.          

    Tags