logo

BREAKING NEWS

कंधार येथे उद्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन

कंधार, येथील दिनांक 20 मे रोजी सायंकाळी 5 वाजता जी.एल.सी.प्रा.ली.नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त भव्य भीमगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे येथील सुप्रसिद्ध गायक शाहीर सिद्धार्थ कांबळे व मयुरी खाडे पुणेकर यांच्या यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम 20 मे रोजी सायंकाळी 5 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक जी.एल.सी.प्रा.ली. नांदेड, नवयुवक भीमजयंती मंडळ कंधार,पंचशीलदादा कांबळे मित्रमंडळ लोहा,भास्कर कदम मित्रमंडळ शेकापुर यांच्यावतीने करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास लोहा व कंधार तालुक्यातील सर्व बौद्ध अनुयायांनी लाभ घ्यावा असे आवाहन नागेंद्र कांबळे,किरणकुमार कांबळे,सचिन पट्टेकर, विनोद कांबळे,सचिनराजे कांबळे, पवन कांबळे, राजरत्न कांबळे, संदेश कांबळे, संजय सिंनगारपुतळे, सुनील घोडजकर, सोनु पवार, धनराज सोनकांबळे सोनु महाबळे, अभिजित वाघमारे, प्रदीप सरोदे, धोंडिबा रायबोले व मीडिया पार्टनर म्हणुन मयुर कांबळे,संघपाल वाघमारे, दिगंबर गायकवाड, भुजंगराव सोनकांबळे, दिगंबर वाघमारे, राजेश्वर कांबळे,मुरलीधर थोटे, भागवत गोरे, एन.डी.जाभाडे, विठ्ठल गंदलवाड व समस्त मित्र मंडळ लोहा कंधारच्या वतीने करण्यात आले आहे.

    Tags