logo

BREAKING NEWS

लाचखोर गट विकास अधिकारी तीन दिवस पोलीस कोठडीत

नांदेड, कंधार तालुक्यातील एका मंदिराच्या संरक्षण भिंतीचे काम झाल्याचे बिल मंजूर करुन घेण्यासाठी 15 हजाराची लाच घेणाऱ्या कंधारच्या गटविकास अधिकाऱ्याला नांदेडचे सहाय्यक सत्र न्यायाधिश हरीभाऊ वाघमारे यांनी तीन दिवस म्हणजेच 22 मे 2017 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

काल दि.18 मे रोजी सायंकाळी 4 वाजता कंधारचे गटविकास अधिकारी किरण सुभाष सायमोते यांनी हाळदा येथील जगदंबा मंदिराच्या संरक्षण भिंतीचे काम झाल्याचे बिल मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपये लाच मागितली. तडजोडीनंतर लाचेचा आकडा कमी झाला आणि दीड हजार रुपयाची लाच स्विकारल्यानंतर गटविकास अधिकारी किरण सुभाष सायमोते यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले.त्यांच्याविरुध्द कंधार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल झाला.  सध्या न्यायालयांना सुट्या असल्याने किरण सुभाष सायमोतेला नांदेडच्या जिल्हा न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागण्यात आली. किरण सायमोतेच्या वतीने पोलीस कोठडीला विरोधही झाला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक अशोक गित्ते हे करीत आहेत. युक्तीवाद एकल्यावर न्यायाधिश हरीभाऊ वाघमारे यांनी दीड हजाराची लाच घेणाऱ्या किरण सायमोतेला तीन दिवस म्हणजे 22 मे 2017 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.  

    Tags