लोहयाच्या अंध विद्यालयाचा प्रश्न महिण्या भरात मार्गी लावणार - राज्यमंत्री दिलीप कांबळे

लोहा(हरिहर धुतमल)अंध विद्यार्थ्यांसाठी समर्पित भावनेने डॉ. संजय गुंडावार हे काम करीत आहेत. शारीरिकदृष्ट्या अपंगत्व आलेले असतानाही या विद्यार्थ्यांसाठी जे काम सुरु आहे ते पहाता निश्चितच हेलन केलर अंध-अपंग विद्यालयाच्या प्रलंबित प्रश्न अधिवेशन संपताच महिन्याभराच्या आत मार्गी लावला जाईल. राज्यातील उपेक्षित-शेतकरी-कष्टकरी-मागासवर्गीय-आदिवासी अल्पसंख्यांक समाजाच्या हिताची जपणूक करणारे भाजपचे सरकार आहे. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आशीर्वादामुळे हे सरकार आले आहे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी लोहा येथे केले.

लोहा शहरातील डॉ. हेलन केलर अंध प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची सदिच्छा भेट दिली. यावेळी भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष देविदास राठोड, गंगाधर कवडे, कृउबा उपसभापती मारोती पाटील बोरगावकर, भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश पाटील हिलाल, संस्था अध्यक्ष डॉ. संजय गुंडावार, सरपंच अमोल पाटील ढगे, मुख्याध्यापक गजानन स्वामी, गणेशराव अनेराव, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे बिलाल कुरेशी, सचिन कोटे यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, अंध मुलांच्या जीवनात डोळस पणे कार्य करणाऱ्या डॉ. संजय गुंडावार यांच्या सारखी समाजात काही मोजकी माणसे आहेत त्यामुळे या विशेष वर्गाला, दिव्यांगाना मोठा आधार मिळतो येथे आल्यानंतर डॉ. हेलन केलर शाळेची प्रगती पाहून आपण प्रभावित झालो. महिना भरात माध्यमिक विभागातील प्रश्न मार्गी लावला जाईल असे अश्वासीत केले. स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आशीर्वादामुळेच आपण इथं पर्यंत आलो हि कृतज्ञता व्यक्त करत देविदास राठोड व डॉ. गुंडावार यांच्या कामाची प्रशंसा केली. अंध विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले व या संस्थेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

गुंडावार यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पुरस्कारा साठी शिफारस
--------------------
डॉ. संजय गुंडावार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पुरस्कारासाठी शिफारस करण्याची घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी केली. 1970-80 च्या दशकात संजय गुंडावार यांचे वडील डॉ. ग.सो. गुंडावार यांनी दलित, मागासवर्गीयासाठी सरपंच असताना खऱ्या अर्थाने सामाजिक समतेचे काम केले. त्या कामाची नोंद राज्यसरकारने घेतली व त्यांच्या चिरंजीवासाठी हा पुरस्कार देण्याची शिफारस केली हि बाब लोह्यासाठी अभिमानाची आहे. संचलन व आभार प्रवीण शेंडे यांनी केले.

Related Photos