Breaking news

अहमदपूर नगरपालिकेच्या स्विकृत सदस्यपदी दीपक शिंगडे यांची निवड

लोहा(प्रतिनिधी)लोह्याच्या भूमीत शालेय शिक्षणासह दीर्घ काळ वास्तव्याला असलेला युवा कार्यकर्ता दीपक वामनराव शिंगडे यांची अहमदपूर नगर पालिकेच्या स्वीकृत सदस्य पदी निवड झाली आज सभागृहात घोषणा करण्यात आली.त्यांच्या निवडीचे लोह्यात जोरदार स्वागत करण्यात आले

लोह्यातील शिव छत्रपती प्राथमिक शाळेच्या स्थापनेपासून मुख्याध्यापिका म्हणून सौ. के.डब्ल्यू. शिंगडेबाई यांनी सेवा केली. त्यांचे थोरले चिरंजीव दीपक यांनी अहमदपूर येथे युवकांची मोठी फळी विधायक कामासाठी उभारली आहे. मागील निवडणुकीत दीपक यांची पत्नी मीना शिंगडे निवडणून आल्या होत्या. पाणी पुरवठा सभापती त्यानी काम केले. राष्ट्रवादी कोंग्रेसचे माजी आ. बाबासाहेब पाटील यांनी आता स्वीकृत सदस्य म्हणून युवक कार्यकर्ता दीपक शिंगडे यांना संधी दिली. आज सभागृहात घोषणा करण्यात आली. मागील पंचायत समिती निवडणुकीत सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्ही.जी. चव्हाण, के.जी. चव्हाण यांची पुतणी व सेवा निवृत्त शिक्षक एकनाथ चव्हाण यांची कन्या राजकन्या यानी अहमदपूर पंचायत समितीचे सभापती म्हणून पद भूषविले. इंदिरा नगर (लोहा) येथील गोविंद कांबळे नगरसेवक होते. यावेळी दीपक शिंगडे सभागृहात आहेत.

त्यांच्या निवडीबद्दल दीपकचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद कलमे. वैद्यकीय अधिकारी सौ. राजश्री कलमे, डॉ. साबदे, स्त्रीरोग तज्ञ सौ. जयश्री साबदे, प्रकाश शिंगडे, महानंदा शिंगडे , माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार ,माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, कृउबा संचालक केशवराव मुकदम,सेवानिवृत मुख्याध्यापक एम .एस देशमाने,शिक्षक नेते हरिभाऊ चव्हाण,बालाजी खिल्लारे ,माजी नगरसेवक रमेश माळी, युवा कार्यकर्ता पंचशील कांबळे, राम ढगे, सयाजी फुलपगार,अनिल धुतमल, प्रवीण धुतमल,पत्रकार शेख अहमद, रत्नाकर महाबळे, प्रमोद धुतमल,डी एन कांबळे, यांनी अभिनंदन केले आहे.

Related Photos