Breaking news

कंधार मध्ये कुविचारांची केली होळी

कंधार(मयुर कांबळे)अक्षरोदय साहित्य मंडळ शाखा कंधारच्या वतीने महाराणा प्रताप चौक कंधार येथे सायंकाळी 5 वाजता सर्व अक्षरोदय साहित्य मंडळाच्या वतीने कुविचारांची होळी करण्यात आली.

कंधार येथील होळी या सना निमित्य अक्षरोदय साहित्य मंडळ कंधारच्या वतीने दि.12/3/2017 रोजी सायंकाळी 5 वाजता महाराणा प्रताप चौक कंधार येथे अंधश्रदा,भ्रष्टचार,महागाई,लोकसंख्यावाढ,व्यसनाधीनता,घातक प्रदुषण, स्त्रीभुण हत्या,या सह आदी कुविचारांची होळी करण्यात आली.यावेळी अक्षरोदय साहित्य मंडळ कंधारचे अध्यक्ष शेख युसुफ,उपाध्यक्ष राजेश्वर कांबळे,सचिव गंगाधर ढवळे,सहसचिव दिगंबर वाघमारे,कोषाध्यक्ष डॉ.माधव कुद्रे,प्रसिद्धी प्रमुख मयुर कांबळे,सदस्य शेख शादुल,विठ्ठल गंद्लवाड, मुनीर शेख आदीची उपस्थिती यावेळी होती. होळी पेठवण्याच्या प्रारंभी मंडळाच्या सर्व सदस्य यांच्या वतीने कोरडे रंग लाऊन आनंद साजरा करण्यात आला व कुविचारांची मोठ्या उत्सवात होळी पेठवण्यात आली.या अनोख्या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Related Photos