रंग विकणाऱ्या मुस्लीम तरुणामुळेच रंग साधतात धार्मिक सहिष्णुता !

लोहा(हरिहर धुतमल) जात - धर्माचा पगडा शिकल्या सवरल्यावर हल्ली जास्तीचा बसला आहे. माणसं जितकी जास्त शिकली... तितकी ‘जातीला’ जास्त चिकटली... त्याचा आपणास... वारंवार प्रत्यय होतो... हिंदू - मुस्लीम... असा धार्मिक भेदभाव अनेकदा अनुभवायला मिळतो... रंतु ‘रंग बरसे’... चा आनंद आपण लुटतो... ‘होलिकोत्सवाला’ रंग विकणाऱ्या ‘मुस्लीम’ तरुणामुळेच आपणास रंगधुळीची मौज - मजा करता येते. ‘रंग’ साधतात धार्मिक सहिष्णुता !

होळीच्या पूर्वसंध्ये पासून ते रंग पंचमी पर्यत ‘एजाज आतार, शकील पट्टेकर’ या तरुणांच्या गाड्यावर लाल...पिवळा...निळा...भगवा...पारवा...तांबडा...गुलाबी अशा विविध कोरड्या आणि पाण्यात टाकून खेळवायचे रंग खरेदी साठी गर्दी झाली होती.

एरवी भगवा...हिरवा...निळा...या रंगावरून अनेक ‘वादंग’ होत असतात. हिरवा रंग ‘भगवेकरांना’ आणि भगव्यांना ‘निळा’ रंग फारसा पसंत नसतो परंतु रंगपंचमी या सगळ्या रंगाचे ‘मिश्रण’ करते...त्त्यातच ‘सहिष्णुता’ दडली. धार्मिक वाद अनेकवेळा त्रासदायक ठरतात परंतु मुस्लीम धर्मियाचा छोटा-मोठा व्यापार ‘हिंदू’च्या सणाला अधिक व्यापक करणारा असतो. भाऊबिजेला ‘करदोडा’.. महालक्ष्मी... लग्न समारंभात... ’नागीलीची’ पान...सौभाग्याच ‘हळद-कुंकू’...मोठमोठ्या मंदिरासमोर ‘प्रसाद’...अशी सगळी ‘पूजाअर्चा’ ची साहित्य मुस्लीम बांधव विकतात.

रंगधुळीत लाही त्यांच्याच गाड्यावरच्या रंगाची मनसोक्त उधळण...आपल्याला करायला मिळते. ‘रंगात...काय पडलं ?’ असं जरी वाटत असलं तरी रंगावरून ‘राजकारण’ आणि राजकारणाचा ‘रंग’ नेहमीच केला जातो. धुळवडीला वेगवेगळ्या रंगाची होणारी बरसात...आनंद देणारी..पण त्यातूनही ‘धार्मिक सहिष्णुता’ जपली जाते हे त्याचे ‘सर्व-धर्म-समभाव’ चे रंग सामाजिक एकोप्याला ‘गडद’ करतात हे निश्चित.

Related Photos