Breaking news

रूईगावा नजीक ट्रक-दुचाकीचा भिषण अपघात दोन जागीच ठार

कंधार(मयुर कांबळे)कंधार-मुखेड मार्गावरील रूई गावा नजीक ट्रक -दुचाकीचा भिषण अपघात झाला असून दोन जागीच ठार झाले असल्याची घटना आज सकाळी 9 ते 10 च्या सुमारास घडली आहे. मयतामध्ये दोघे हि कंधार येथिल रहिवाशी असुन ते मुखेड येथे नगरपालिकेत कारकुन या पदावर कार्यरत होते.

या बाबत सविस्तर माहिती असी कि  कंधार येथील दोन कर्मचारी मुखेड नगरपालीकेत कारकून या पदावर कार्यरत होते.अख्तर मिर्झा बेग रा.हातीपुरा कंधार वय वर्ष 40 व संजय फुले रा.मुक्ताई नगर कंधार वय 40 हे दोघे जण दररोज ये जा करत असताना आज सकाळी 9 ते 10 च्या सुमारास त्यांची मोटार सायकल क्र.एम एच 26 ऐ जे 1177 या दुचाकीवर मुखेड कडे निघाले असता रुई या गावा जवळ ट्रक क्रमांक एम एच 26 ऐ डी 0534 समोरून येऊन धडक दिल्या कारणाने दोघांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज दि.15/03/2017 रोजी घडली आहे.या आपघातामुळे कंधार शहरावर शोककळा पसरली आहे. ग्रामीण रुग्णालय कंधार येथे मयतांचे पार्थित्व आणल्याने लोकांची गर्दी पाहण्यासाठी झाली होती. त्यामुळे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. वृत्त लिहेपर्यंत कसल्याच प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता. ट्रकचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस बांधवांकडून बोलल्या जात होते.

Related Photos