नवयुवक भीमजयंती मंडळ बौद्धद्वारची कार्यकारणी

कंधार(मयुर कांबळे)बौद्ध द्वार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्य बैठक घेण्यात आली यावेळी जयंती मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन अध्यक्ष पदी नागेंद्र कांबळे तर सचिव पदी माधव कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

महामानव विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती चे औचित्य साधुन दि.15/03/2017 रोजी सायंकाळी 7 वाजता बौद्ध द्वार बुद्ध विहारात पत्रकार मयुर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.यावेळी जयंती मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन जयंती मंडळाच्या अध्यक्ष पदी नागेंद्र कांबळे तर उपाध्यक्ष पदी किरणकुमार कांबळे,सचिव पदी माधव कांबळे व कोषाध्यक्ष पदी सचिन पट्टेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यावेळी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली.त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्य विविध उपक्रम राबविण्याचा आराखडा तयार करण्यात आला व अत्यंत खेळी मेळी च्या वातावरणात सर्वानुमते कार्यकारणी ची निवड करण्यात आली असुन वरील सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.या बैठकीस कविकुमार कांबळे,सचिन कांबळे,राजरत्न कांबळे,संदेश कांबळे,राज कांबळे, विनोद कांबळे,मंगेश कांबळे,कपिल पट्टेकर,अजय जोंधळे,छकुल कदम,भार्गव कांबळे,शंकर जोंधळे,सुशांत कांबळे,रितेश कांबळे,शुभम जोंधळे,राहुल कांबळे आदींची उपस्थिती यावेळी होती.

Related Photos