सुभेदार मल्हारराजे होळकर जयंती व सत्काराचेे आयोजन

नांदेड(प्रतिनिधी)येथील मौर्य प्रतिष्ठानच्यावतीने दि.19 मार्च रोजी सुभेदार मल्हारराजे होळकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने या कार्यक्रमात विशेष सत्कार मुर्ती म्हूणन ऍड.शिवाजीराव हाके, न.पा., प.ंस., जि.पं, या निवडणूकीत नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्काराचे आयेाजन करण्यात आले आहे.

दि.19 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शहरातील विजयनगर येथील हनुमान मंदिर मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्राच्या अध्यक्षस्थानी कमलाकर देमगुंडे हे राहणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून होळकर शाहीचे अभ्यासक प्रा.मुरहारी कुंभारगावे हे राहणार आहेत. याच कार्यक्रमात ऍड.शिवाजीराव हाके यांच्या वकीली क्षेत्रात 50 वर्षे पूर्ण झाल्यामुळे व भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीवर वैभव खांडेकर यांची निवड झाल्याने या दोन मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका या निवडणूकीत धनगर जमातीतील नवनिर्वाचित सर्व लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती मौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.यशपाल भिंगे, सचिव महेंद्र देमगुंडे,गोविंद गोरे, प्रदिप सरोदे, इंजि.बालाजी काळे, गजानन सरोदे, विलास काळे, जगदीश उराडे, कैलास खरबे, केशव रोडे, नवनाथ काकडे, शिवाजी गोरे, गजानन हाके, गणेश माने, संतोष बारसे, रवि टिकोरे, संतोष चोरमले आदींनी केले आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन मौर्य प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Photos