Breaking news

पराभवानंतर देखील जनतेच्या कामासाठी तत्पर - वर्षाताई भोसीकर

कंधार(मयुर कांबळे)गेल्या महिण्यात पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत माझा पराभव जरी झाला असला तरी मतदारांच्या कामासाठी सदैव तत्पर राहुन जनसामान्यांच्या समस्या सोडवेल असे प्रतिपादन जि.प.सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. दि.15 रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर,प्राचार्य राजेंद्र भोसीकर,हमीद मौलीसाब, हणमंतराव पेठकर,ऍड पांगरेकर,डॉ.गुट्टे,लाडेकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी जि.प.सदस्या वर्षाताई भोसीकर म्हणाल्या की फुलवळ गटात विकास कामे करून फुलवळ सर्कल हा कुपोषणमुक्त,हागंदारी मुक्त करून घराघरात स्वचालये उपलब्ध करून दिले आहेत.त्याच बरोबर पिण्याच्या पाण्यासाठी कोसो दूर होणारी भटकंती शासनास पाठपुरावा करून मी थांबविली आहे.रस्त्यांच्या समस्या दूर केल्या आहेत.लेक शिकवा अभियान हे प्रभावी पणे राबवुन फुलवळ पॅटर्न संपुर्ण महाराष्ट्रात नावा रुपाला आणला आहे त्याच प्रकारे बहाद्दरपुरा गट हा सुद्धा तश्याच प्रकारे नावा रुपाला आणायचा होता परंतु माझे ते स्वप्न अधुरे राहिले आहे.तरी सुद्धा मी येवढ्यावरच न थांबता जनतेच्या अडी अडचणी सदैव दूर करण्यासाठी पराभवानंतर देखील तत्पर आहे असे सौ.वर्षाताई भोसीकर यांनी बोलताना व्यक्त केले.माझा पराभव जरी झाला असला तरी मी हार न मानता मोठ्या जोमाने सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तयार आहे.तुम्ही हाक द्या तुमच्या एका हाकेला धाऊन येऊन तुमच्या समस्या सोडवू असे ही त्या म्हणाल्या.जय पराजय हा निवडणुकीत होत असतो ज्या प्रकारे माता सावित्रीबाई फुले यांनी अंगावर शेणाचे गोळे झेलून त्या स्त्रीयांना शिक्षण मिळावे म्हणून शेवटच्या क्षणा पर्यंत तत्पर राहिल्या आणि शेवट पर्यंत त्या लढा उभारुन स्त्रियांना शिक्षणाचे अधिकार मिळवुन दिल्या अश्या सावित्री बाईंच्या विचाराची प्रेरणा घेऊन मी परभवा नंतर उभी राहून जनतेच्या समस्यां सोडवणार आहे.

निवडणुकीत विजय हा खऱ्या अर्थाने कामे करून व मने जिंकून होतो मतदारांना भावनिक करून होत नाही.स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्याकरिता बऱ्याच खस्ता खाव्या लागतात.जनमानसात मिसळावे लागते किंवा लोकांशी संपर्क ठेवावा लागतो.लोकांना भावनिक केल्याने स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित होत नाही असे त्या म्हणाल्या.बहाद्दरपुरा सर्कल मध्ये मतदारांनी दिलेले मत माझ्यासाठी मोलाचे आहे.निवडणुका होत असतात परंतु जनतेची सेवा मला खऱ्या अर्थाने करायची आहे. माझा पराभव जरी झाला असलातरी मी सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर आहे.विजयी उमेदवाराच्या विरोधात मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे हि जि.प सदस्या वर्षाताई भोसीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केले आहे.

Related Photos