Breaking news

बालकांच्या प्रवेशाचा आनंदमय प्रवेशोत्सव साजरा संपुर्ण तालुक्यात उपक्रम राबवा - गटशिक्षण

कंधार(मयुर कांबळे)पानभोसी तालुका कंधार मधील केंद्र पानभोसी व बहाद्दरपुरा या केंद्रातील शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ मध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशपात्र आसणा-या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव दि.१५ मार्च रोजी आनंदात साजरा झाला .

जि प प्रा शाळा चिखलभोसी या शाळेने देखणा प्रवेशोत्सव साजरा केला .गटशिक्षणाधिकारी बालाजीराव कपाळे यांच्या मार्गदर्शणाखाली व शि वि अ सौ अंजली कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी केंप्रमुख अनिल कांबळे , सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य..शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक या आनंदोस्तवामध्ये सक्रिय सहभागी झाले होते . सर्व विद्यार्थ्याना पुष्पहारानी सजवले होते . बॅंड ढोल , लेझीम पथकांसहा बैलगाडीतुन विद्यार्थ्यांची गावातील सर्व मुख्य रस्त्याने मिरवणुक काढण्यात आली या उत्सवाने विद्यार्थ्यांचे व पालकांचे मन आनंदुन गेले . या बिटाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ. अंजली कापसे यांनी कार्यक्रमाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की आंगणवाडीमध्ये सलग तीन वर्ष आनंदमय शिक्षण घेवुन मोठ्या शाळेत जाण्यांची ज्यांची इछा आसते आणि दादासोबत ताईसोबत रडत रडत येवुन तुमच्याच शाळेत लडीवाळपणे बसतो म्हणानरे चिमुकले ज्याना या शाळांचे कुतुहल व आकर्षण आसते आशा सर्व प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देवुन त्यांच्या कुतुहलाला व आकर्षणाला सर्व शाळानी भरभरुन प्रतिसाद दिला .त्या बद्दल सर्वाचे कौतुक केले. व हा उत्सव

प्रत्येक शाळेमध्ये विविधता व एकरुपतेचा आनंद साजरा करणारा असुन पानभोसी बीटामध्ये नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रमांची रास मांडली गेल्याचे त्या म्हणाला . तर गटशिक्षण अधिकारी बालाजी कपाळे यांनी यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की गशिअ प, स .लातुर तृप्ती अंधारे यांच्या स्पेशल फोकस १ क्लास या नियोजनाचा संदर्भ व मार्गदर्शन घेवुन इयत्ता पहिलीच्या प्रवेशपात्र विद्यार्थ्याना शाळेत कसे टीकवायचे आणि त्याना शाळेविषयी आवड कशी निर्माण करावयाची व शाळेची भिती नाहिशी कशी करायची याचे नियोजण करुन पुढे ०१ मे २०१७ पर्यंत सर्व विद्यार्थी शाळामय कसे होतील याकडे लक्ष दिले जाणार आहे . त्यामुळे जुन २०१७ मध्ये सुरुवातीपासुनच विद्यार्थी शाळेकडे उत्साहाने येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

पानभोसी केंद्रातील जि प कें प्रा शाळा पानभोसी , चिखलभोसी ,धर्मापुरी ( म ), धर्मापुरी तांडा ,पांगरा , पांगरा तांडा , वंजारवाडी, खुड्याची वाडी ,इमामवाडी , नवघरवाडी ,लालवाडी , लालवाडी तांडा या सर्व शाळामधुन प्रवेशपात्रना प्रवेश देण्यात आला . तसेच बहाद्दरपुरा केंद्रातील मानसपुरी व इतर शाळामधुन प्रवेश देण्यात आला .या नियोजणाप्रमाणेच तालुक्यातील जि प कें प्रा शाळा शेकापुर या शाळेतही प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला .

Related Photos