Breaking news

डॉ.आंबेडकर यांची अवमान जनक पोस्ट टाकणाऱ्यास कडक कार्यवाही करा

कंधार (मयुर कांबळे) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती अवमान जनक पोस्ट टाकणाऱ्या भातुलकी जिल्हा अमरावती येथील संदेश बुरघाटे याच्यावर कडक कार्यवाही करून त्याच्यावर अट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करा असे निवेदन सम्यक विध्यार्थी आंदोलन कंधारच्या वतीने पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.

निवेदनात असे लिहिण्यात आले आहे की भातुलकी जिल्हा अमरावती येथील सोसियल मीडियाच्या E.M.GROUOP.I.T.I.Bhaktuli या व्हाटसअप ग्रुपवर 9960048169 या नंबर हुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतीमा कुत्र्याच्या मुखाला लावुन आंग्रेजोका फालतु कुता असे अवमान जनक पोस्ट टाकणाऱ्या संदेश बुरघाटे पाटील या हारामखोराने केलेल्या पोस्ट मुळे तमाम भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत.असे गैर कृत्य करणाऱ्या व सामाजीक शांतता बिघडावणाऱ्या संदेश बुरघाटे पाटील याच्यावर तात्काळ कडक कार्यवाही करून त्याच्यावर अट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन कंधार पोलीस स्टेशन येथील पीएसओ लगडे यांना सम्यक विध्यार्थी आंदोलन कंधारच्या वतीने देण्यात आले आहे.

या निवेदनावर माधव कांबळे सम्यक विध्यार्थी आंदोलन ता.उपाध्यक्ष कंधार,सचिन पट्टेकर सम्यक विध्यार्थी आंदोलन शहर अध्यक्ष,आनंदा व्यवहारे तालुका सरचिटणीस कंधार, संदेश कांबळे,राजरत्न कांबळे,मयुर कांबळे,नागेंद्र कांबळे,विनोद कांबळे,मंगेश कांबळे,भार्गव कांबळे,मयुर कदम,दलितानंद जोंधळे,विशाल कदम,किशन कदम,राजु कांबळे, कपिल पट्टेकर इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Photos