Breaking news

लोहा त‍हसील कार्यालयात कर्मचा-याचे लेखणी बंद आदोलन

लोहा(प्रतिनिधी)महसुल कर्मचारी संघटनेच्‍या वतीने संपुर्ण मराठवाडयात कै गजानन चौधरी यांच्‍या निधनामुळे लेखणी बंद आदोलन जाहीर केले होते. त्‍या आदोलनात लोहा महसुल कर्मचारी संघटना सहभागीझालेली होती आज दिवस भर कर्मचा-याने लेखणी बंद ठेउन आदोलनात सहभाग घेतला अशी माहिती सघटनेचे अध्‍यक्ष जी के पटणे यांनी दिले

औरगांबाद जिल्‍हाधिकारी कार्यालयातील अव्‍वल कारकुन गजानन चौधरी यांचे अतिकामामुळे तनाव वाढला आणि हदयविकाराच्‍या झटक्‍याने निधन झाले त्‍यांच्‍या अनुषंगाने व इतर मागण्‍यासाठी संपुर्ण मराठवाडयात महसुल कर्मचा-यांनी लेखनीबंद आंदोलन केले त्‍यात लोहा महसुल संघटनेनी सक्रीय सहभाग नोंदवत दिवसभर लेखणीबंद ठेवले अध्‍यक्ष जी. के. पटणे, सचिव सी. पी. धर्मेकर उपाध्‍यक्ष सतीष धोंडगे, सह‍सचिव पी. पी. बडवणे, श्रीमती एस.आर. वाळुजकर, बी.जी. शिंदे, पी.के. मुंगरे, व्‍ही.जी. गायकवाड, डि.टी. वाघमारे, श्रीमती झंपलकर, श्रीमती. वावळे, श्रीमती राउत , एस.बी. धोंडगे, एस.जी. मुंगले, या सह कर्मचारी सहभागी झाले होते.

Related Photos