शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीचे पंचनामे त्वरित करावे

नांदेड(प्रतिनिधी)नांदेड जिल्ह्यात दि. 15 रोजी वादळी वाऱ्यासह पावसामुळे निळा, एकदरा, आलेगाव या परिसरातील गहू, हरभरा, ज्वारी, हळद, तूर, आंबा या पिकांचे अचानक आलेल्या पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मोबदला देण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रोहिदास हिंगोले यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

वादळी वाऱ्यासह काढणीला आलेला गहू, हरभरा, ज्वारी, तूर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अगोदरच शेतमालाचे भाव अत्यंत कमी असून निसर्गाने दुसरे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे केले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी वरील पिकांचा विमा काढला आहे, अशा शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा व्हावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर रोहिदास हिंगोले, रघुनाथ दुधमल, शंकर सोनटक्के यांच्या सह्या आहेत.

Related Photos