Breaking news

जलयुक्त शिवारातुन दुष्काळावर मात करता येईल - सौ.वर्षाताई भोसीकर

कंधार(मयुर कांबळे)जलयुक्त शिवार ही काळाची गरज असुन यातुनच भविष्यातील दुष्काळावर मात करता येईल यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आव्हान जि.प.सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर यांनी कंधार तालुक्यातील पानभोसी येथे नालाखोलीकरण व सारळीकरणाच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले. या प्रसंगी गुरु गयबी नागेंद्रभारती महाराज,जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संजय भोसीकर,प्राचार्य राजेंद्र भोसीकर,सरपंच सौ.सुवर्णा नाईकवाडे,शिवराज गौड,मनमंथ नाईकवाडे,आदींची उपस्थती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा ग्राम पंचायत पानभोसीच्या वतीने शाल पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागा मार्फत बारा लक्ष रुपयांचे पानभोसी शिवारात 1300 मीटर नाला खोलीकरण व सारळीकरणाच्या कामांचा शुभारंभ सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सौ.भोसीकर म्हणाल्या की जलसंवर्धनासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.पाण्याची बचत करून पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवण्यासाठी गावस्तरावर उपाय योजना कराव्या लागतील तसेच शासकीय निधी बरोबर लोक सहभागातून पाणी स्त्रोतांचे बळकटीकरण झाले पाहिजे यासाठी गावातील नागरिकांनी पुढाकार घ्यावा यातूनच भविष्यातील दुष्काळावर मात करता येईल यावेळी ग्रामस्थांना संजय भोसीकर यांनी मार्गदर्शन करून जलयुक्त शिवार अभियान प्रभावी पणे राबवण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रकाश घोरबांड यांनी केले आभार मनमंथ नाईकवाडे यांनी केले.यावेळी विश्वामभर डुबुकवाड महादू कांबळे,संग्राम नरंगले,प्रभु आप्पा भातमोडे, शेख पाशा पटेल,शिवदास नाईकवाडे,शाम पाटील लुंगारे,रमेश नाईकवाडे,व मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांची उपस्थिती होती.

Related Photos