Breaking news

सामाजिक एकता वृद्धीगंत करताना सर्वांना सामावून राष्ट्रहित साधा - ना. मुनगंटीवार

नांदेड(अनिल मादसवार)समाजच्या उन्नतीसाठी सामाजिक एकता आवश्यक असून ती वृद्धीगंत करून इतर सर्व समाज घटकांना सामावून राष्ट्रहित साधून आदर्श निर्माण करावे असे आवाहन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते नांदेड येथील नगरेश्वर वैश्य मंदिर समितीच्या वतीने आयोजित 45 व्या उपवर-उपवधु परिचय मेळाव्याचे उद्‌घाटन प्रासंगी बोलत होते. यावेळी मंचावर महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे उपाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, मेळावाप्रमुख गणेश महाजन, नगरेश्वर मंदिराचे अध्यक्ष दिलीप बंडेवार, बिपीन गादेवार, भागवत गंगमवार, आनंद जवादवार, रितेश व्यवहारे, पांडूरंग येरावार आदींसह अनेक मानण्यावर उपस्थित होते.

मुनगंटीवार पुढे म्हणाले की, आजवरच्या आयोजित मेळाव्यातील सर्व चांगले रेकॉर्ड ब्रेक करून आयोजकांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. मी मराठवाड्याचा जावई असून मराठवाड्याच्या विकासाठी झुकत माप शासनाकडून दिले. त्यामुळे अविकसीत भागाचा विकास करण्याचं शासनाचं लक्ष आपल्याकडे ही अनुभूती सर्वांना होत असल्याने सर्वे भवतू सुखीन: संकल्पना साकारत असल्याच त्यांनी सांगितले. मागील 25 वर्षापूर्वी अशाच मेळाव्याचा मी उद्‌घाटक होतो. त्यावेळी मी उपवर मेळाव्यातूनच विवाहबद्ध झालो. त्यामुळे मेळाव्याची फलश्रुती काय..? असते ही मी अनुभवले, तुम्ही पण अनुभवा. अधिकाधिक विवाह यातून व्हावेत, फालतु खर्च टाळा, पर्यावरणाचे भान ठेऊन समाजोउन्नतीसाठी राष्ट्रोन्नती एक व्हा अशा आशयाच्या सुचनाही त्यांनी केल्या. आपण सक्षम होऊन कोणाच्याही देण्याघेण्याची आशा न ठेवता प्रगती करा असेही ते म्हणाले. आर्यवैश्य समाज हा व्यापारी आहे. एक रूपयाचे चार कसे करायचे हे त्यांच्या रक्तात भिनले आहे. योगायोगाने मी अर्थमंत्री आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत खडखडाट हा कसा खणखणाटात बदलल्या जातोय ही तुम्ही अनुभवता ही देखील ऐतिहासिक बाब आहे. असेही ते म्हणाले. मेळाव्याचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढल्याबद्दल आयवैश्य महासभेचे उपाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, मेळावाप्रमुख गणेश महाजन, मंदिर समितीचे अध्यक्ष दिलीप बंडेवार, सचिव भागवत गंगमवार, उपाध्यक्ष बिपीन गादेवार, सहसचिव आनंद जवादवार, रितेश व्यवहारे, महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, सचिव गोविंद बिडवईसह सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले. इंडिया न्युज चॅनेलमधील जिनीयस टेस्ट लाईव्ह ह्या टी.व्ही. शोमध्ये महाराष्ट्राचा पहिला जिनीयस बॉय मयुर मनोज जगलपूरे हा आर्य वैश्य बालक ठरल्याने त्याचा ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. द्वारका ज्योतीर्लिंग ट्रस्टचे अध्यक्ष यादा अशोक गुप्ता, अनंत ऍग्रो इंडस्ट्रीजच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नरहरी पोलावार पुरस्कार अभियता प्रणद लोकुलवार, राष्ट्रीय वृत्तरत्न पुरस्कार 2017 चे मानकरी पत्रकार डॉ. विजय निलावार, दानशूर प्रशांत निलावार, चांदोजी मंगल कार्यालयाचे संचालक नारायणराव पावडे यांच्यासह अनेकांचा सत्कार करण्यात आला. नगरेश्वर वैश्य मंदिराच्या वेबसाईटचे निर्माण केल्याबद्दल रितेश व्यवहारे यांचा सत्कार करून मुनगंटीवार यांनी या वेबसाईटचा अधिकाधिक लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. ओढीचे क्षण जोडीचे या स्मरणिकेचे त्यांनी कौतुक केले.

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे उपाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी प्रास्ताविकेतून नगरेश्वर मंदिराच्या जागेवरील आरक्षण काढण्याची मागणी केली होती. ना. मुनगंटीवार यांनी सर्व मदत रितसर मिळेल, निश्चित रहा असा आशावाद दिला. ना. मुनगंटीवार व त्यांची पत्नी सौ. सपना मुनगंटीवार यांचा सत्कार नगरेश्वर वैश्य मंदिर समिती, विविध संघटना, महिला, युवक वासवी क्लब यांच्यासह आर्यवैश्य समाजातील उद्योगपती यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार विजय बंडेवार यांनी केले तर बिपीन गादेवार यांनी आभार मानले.

Related Photos