BREAKING NEWS

logo

नांदेड, जिल्ह्यातील व परिसरातील वारकऱ्यांना विट्ठलाच्या दर्शनाला जाण्यासाठी नांदेड ते पंढरपूर विशेष रेल्वे सोडण्यात यावी अशी मागणी शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी निवेदनाद्वारे विभागीय प्रादेशिक व्यवस्थापक, ए.के.सिन्हा, दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड यांच्याकडे केली.

४ जुलै रोजी पंढरपूर आषाढी यात्रेचा सोहळा संपन्न होत आहे. गोर-गरीबांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूरात आषाढी एकादशी निमित्ताने पांडुरंगाच्या दर्शनाला महाराष्ट्रातून दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविकांचा विशाल जनसागर दर्शनासाठी येतो. महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय फार मोठ्या प्रमाणावर आहे. यात नांदेड जिल्ह्यातुनही लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी नित्य-नियमाने जातात. अपुऱ्या वाहन संख्येमुळे हजारो भाविकांची दरवर्षी गैरसोय होत असते ही होणारी गैरसोय टाळण्यासाठी शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी वारकऱ्यांसाठी एक आठवडा विशेष रेल्वे सोडण्यात यावी यासाठी ए.के.सिन्हा, विभागीय प्रादेशिक व्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे,नांदेड यांना निवेदन देण्यात आले.

    Tags