BREAKING NEWS

logo

नांदेड, दक्षिण मध्य रल्वे, नांदेड विभाग विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तसेच तिकीट धारक प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी तिकीट तपासणी मोहीम हाती घेत असते. या अंतर्गतच आज नांदेड विभागाने मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी केली. यावेळी श्रीमती नेहा रत्नाकर, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड, श्री प्रदीप कुमार, सहायक वाणिज्य व्यवस्थापक - एक, श्री अंजी नायक, सहायक वाणिज्य व्यवस्थापक-दोन या तीनही वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात सहभाग घेतला होता. 

हि मोहीम सकाळीच ४.३० वाजता सुरु करण्यात आली. यात नांदेड ते परभणी, परभणी ते जालना, परभणी ते परळी अश्या विविध भागात धावणाऱ्या रेल्वे गाड्या मध्ये अचानक धाडी टाकण्यात आल्या. यात बसेस, जीप चा वापर करण्यात आला. सेक्शन मध्ये अचानक धाड पडल्याने विना तिकीट प्रवाश्यांचे धाबे दणाणले. यात तब्बल 375 विनातिकीट प्रवाशी सापडले. तसेच 48 अनियमित प्रवासी सापडले तर 104 जणांवर परवानगी शिवाय जास्त समान घेवून जाण्यामुळे कार्यवाही करण्यात आली. यातही तीन प्रवाश्यांनी दंड न भरल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. या विना तिकीट प्रवाश्यांकडून एका दिवसातच एक लाख साठ हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आल्या. या कार्यवाहीत सहायक सुरक्षा अधिकारी, 24 तिकीट तपासनीस, 5 कार्यालयीन कर्मचारी, 5 वाणिज्य निरीक्षक, दोन ट्राफिक निरीक्षक, 12 रेल्वे पोलीस फोर्स चे जवान शामिल झाले. या तीनही सेक्शन मध्ये तिकीट तपासणी पूर्ण झाल्या नंतर सर्व अधिकारी आणि कर्मचारी अकोला ते पूर्ण सेक्शन मध्ये गेले आणि तेथील रेल्वे गाड्यांची पण तपासणी केली. 

सर्व मिळून 7 एक्स्प्रेस रेल्वे आणि 7 सवारी गाड्या तपासण्यात आल्या. तसेच तपासणी दरम्यान असे लक्षात आले कि बरेच प्रवासी सीजन तिकीट घेवून आरक्षित डब्यांत बसले होते तसेच दुधवाले जनरल तिकीट घेवून प्रवास करत होते. त्यांना अशे कळविण्यात आले कि त्यांना अशा प्रकारे प्रवास करता येणार नाही. त्यांनी एम.व्ही.एस.टी. तिकीट घेवूनच दुध घेवून प्रवास करावा. तसेच 10 विनापरवाना रेले गाड्या मध्ये खाद्य पदार्थ विकणाऱ्या वरही कार्यवाही करण्यात आली. हि तिकीट तपासणी विनातिकीट प्रवास  करणाऱ्या मध्ये  नैतिक  भीती निर्माण करण्या करिता आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्या करिता करण्यात आली. या तिकीट तपासणी मुळे  कोणतीही रेल्वे गाडी उशिरा धावणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली. या कमी सहायक परिचालन अधिकारी, नांदेड यांनी मदत केली. प्रवाश्यांनी योग्य तिकीट घेवूनच प्रवास करावा आणि होणार्या कार्यवाही टाळावे असे आवाहन रेल्वे विभागातर्फे श्रीमती नेहा रत्नाकर, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड यांनी  केले.

    Tags