BREAKING NEWS

logo

नांदेड, पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आज किनवट येथे दोन चारचाकी वाहनातून विदेशी दारुचा 16 लाख 21 हजार रुपयांचा साठा जप्त करुन आरोपी अजय जयस्वाल याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात कलाम ६५ (ई) ८३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाचे प्रमुख ओमकांत चिंचोलकर यांनि गुप्त माहिती मिळाल्यावरुन किनवट येथे सापळा रचला. आरोपी अजय जयस्वाल हा गाडी क्र.एमएच-22-व्ही-1888 आणि एमएच-26-व्ही-7072 या चारचाकी वाहनातून विदेशी दारु मॅकड्‌वेल, ऑफिसर चॉईस, सिंग्नेचर, रॉयल चॉलेंज या चार प्रकारची दारु अवैधरित्या घेवून जात होता. याच्या कुठल्याही रितसर पावत्या त्याच्याजवळ नव्हत्या. चिंचोलकर यांच्या पथकाने हे दोन्ही वाहने रंगेहात पकडून यातील 31 बॉक्स व 21 बाटल्या जप्त केल्या आहेत. या मालाची किंमत अंदाजे 01 लाख 21  हजार असून, निळ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर आणि राष्ट्रवादीचे चिन्ह लावलेली महिंद्रा बोलेरी या दोन गाड्या असा अंदाजित 16 लाख 21 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी अजय जयस्वाल रा.राजेंद्रनगर किनवट यास अटक केली आहे. विशेष पथकाच्या या कामगिरीने अवैध दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष पथकाची हि चौथी कार्यवाही असल्याने येथील पोलिसांची कामगिरी संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. पकडलेल्या दोन गाड्यांपैकी एकीवर राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह असल्याने राजकीय पक्षांच्या नावाखाली दोन नंबरचे धंदे केले जात असल्याने राजकीय नेत्यांचे अवैद्य धंदेवाल्याच्या कामांशी लागेबांधे असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण या तौक्याचे आमदार राष्ट्रवादी पक्षाचे आहेत, आणि खुद्द आमदारांच्या गावातच सुरु असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर पोलीस अधीक्षक मीना यांच्या मठाकाणे मागील महिन्यात धड टाकून कार्यवाह केली होती हे विशेष आहे.  

    Tags