BREAKING NEWS

logo

नांदेड, मा.महाराष्ट्रराज्य विधीसेवा प्राधिेकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये दि.05 ते दि. 30 जुलै  या कालावधीत जिल्हयातील प्रत्येकतालुक्याचे काही गावांमध्ये फिरत्या लोकन्यायालयाचे व शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मा.कु.सविता टी.बारणे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली फिरत्या लोकन्यायालयाचे जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, जिल्हान्यायालय, नांदेड येथे उद्घाटन करण्यात आले. 

जिल्हयातील सर्व तळागाळापर्यंच्या लोकांना या योजनेचा लाभ घेता यावा या हेतुनेच ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. छोटया-छोटया गोष्टींमुळे होणारे वाद वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित ठेवून आपला बहुमुल्य वेळ वाया न घालवता पक्षकारांनी या फिरत्या लोकन्यायालयात आपले आपसातील वाद सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन केले. यावेळी मा.श्री. भीमराव नरवाडे, सेवानिवृत्त जिल्हान्यायाधीश, यांनी या फिरत्या लोकन्यायाल याचा पुर्वीचा अनुभव विषद करतांना यापुढेही सर्व पक्षकार बांधव याचा फायदा अवश्य घेतील असे सांगीतले. मा.श्री. एस.आर.जगताप, जिल्हान्यायाधीश-1, नांदेड, मा.श्री.डी.टी.वसावे, सचिव, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, नांदेड, मा.श्री.अॅड. अमरिकसिंघ वासरीकर, जिल्हा सरकारी वकिल, नांदेड, मा. श्री.अॅड. मिलींदएकताटे, अध्यक्षअभिवक्तासंघ, नांदेडमा.श्री.अॅड. जगजीवन भेदे, उपाध्यक्ष, अभिवक्ता संघ, नांदेड, हे कार्यक्रमास उपस्थित होते. 

या सोहळया निमित्त्य जिल्हा न्यायालयातील सर्व सन्मानिनिय न्यायाधीश, न्यायालयीन व्यवस्थापक श्री.एम.के.आवटे तसेच न्यायालयीन कर्मचारी, विधिज्ञ, पक्षकार मोठया सेख्येने उपस्थित होते. जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने व्यासपिठावरील सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. मा.न्या.श्री.डी.टी.वसावे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना फिरते लोकन्यायालयाची व कायदेविषयक शिबीराची संकल्पना, महत्त्व, उद्येश, त्यामागची भूमिका सविस्तर विषद केली. जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश, मा.कु.सविताटी.बारणेयांनी ‘‘न्याय आपल्या दारी’’ या संकल्पनेतील फिरत्या लोकन्यायालयाच्या वाहनाचे उद्घाटन करून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यास शुभेच्छा दिल्या. तद्नंतर न्यायालयातील प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी काही प्रकरणे या फिरत्या लोकन्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली होती. सुत्रसंचलन मा.श्रीमती एस.एस.तोडकर, जिल्हा न्यायाधीश-7, नांदेड यांनी केले तर अॅड. नय्युमखान पठाण, यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमानंतर लगेचच जिल्हान्यायालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्व न्यायधीश, अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. श्री.मिलींद एकताटे, अॅड. अमरिकसिंघ वासरीकर, अॅड. आर.जी.परळकर व इतर ज्येष्ठ विधिज्ञ तसेच न्यायालयीन कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले.

    Tags