BREAKING NEWS

logo

नांदेड, किनवट तालुक्यातील सिंदखेड पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या विशेष पथकाच्या कारवाहिचे सत्र चालुच आहे. एका महिन्यातील आजची हि ४ थी कारवाई असून, वाई बाजार येथील मटका अड्डावर छापा टाकून ९ आरोपीना अटक केली आहे. दरम्यान घटनेतील तिघे मटका किंग फरार झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, काळ दि.०५ बुधवारी सायकांळी पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिना यांचे विशेष पथक माहूर हद्दीतील जुग़ाराची कार्यवाही करून परतून जात होते. दरम्यान पेट्रोलिंग गस्तीवर असताना त्यांना खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहीतीवरून असे कळाले की, वाई बाजार येथे विश्वजीत राठोड, पंडीत राठोड व मुकेश जाधव हे तिघे संगनमताने भागीदारीत मटका चालवत आहेत. याबाबतची प्रथम खात्री करून, पोलीस अधिक्षक मीना यांचे आदेशानुसार विशेष पथकाचे प्रमुख ओमकांत चिंचोलकर यांनी सिंदखेड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वाईबाजार येथील एका घरात चालविल्या जाणाऱ्या मटका अड्डावर धाड टाकून उद्धवस्त केला. यावेळी काही व्यक्ती फोन व स्वतः मटक्याच्या चिठ्या फाडताना आढळून आले. यात प्रमुख ९ व्यक्तीना पथकाच्या टीमने रंगेहात पकडुन सिंदखेड पोलीसमध्ये त्याच्या विरोधात मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यातील तरतूद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात एकुन १४ हजार ४०० रुपयांचा नगदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीपैकी तीनही मटका किंग फराऱ झाले असून, आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान सिंदखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विशेष पथकाची एकाच महिन्यात ४ थी कार्यवाही झाली असुन, सिंदखेड पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्र्नचिन्ह निर्माण होत आहे. या प्रकाराकडे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत परिसरातील नागरीकातून व्यक्त केल्या जात आहे.

    Tags