logo

किनवट, तालुका विधीसेवा प्राधिकरण व वकील संघटनेच्या वतीने किनवट न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत दि. 08 जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारीची पाच प्रकरणे तडजोड पद्धतीने मिटविण्यात आली.

प्रारंभी किनवट येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन तालुका विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी.आर.कोलते, सह दिवाणी न्यायाधीश जे.आर.पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या राष्ट्रीय लोकअदालतीत दिवाणी व फौजदारी अशी पाच प्रकरणे तडजोड पद्धतीने मिटविण्यात आली. या राष्ट्रीय लोकअदालतीसाठी दोन पॅनल होते. एका पॅनलवर प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश कोलते व दुसर्या पॅनलवर सहदिवाणी न्यायाधीश पठाण यांनी काम पाहिले. तर पॅनल मेंबर म्हणून अॅड. ए.एम.कोमरवार, अॅड.आर.पी. पुरुषोत्तमवार, माजी नगराध्यक्ष के.मूर्ती, व्हि.एम. शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. विजय चाडावार, सचिव अॅड. कृष्णा राठोड, अॅड.यु.बी.चव्हाण, अॅड.यशवंत गजभारे,अॅड.सुभाष ताजणे, अॅड.कुरेशी, अॅड.आर.डी. सोनकांबळे, अॅड. संतोष नेम्मानीवार, अॅड.डी.एम.दराडे, अॅड.पी.पी.गावंडे,  अॅड.सिडाम, अॅड.आयतलवाड आदी उपस्थित होते. राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी वर्षा बोलेनवार, म्यानावार, मोहन कुलकर्णी, चटलावार, वाघमारे, मुजहिद अब्दुल, लोणे, कारलेकर, लव्हेकर, जोंधळे, रायबोळे आदींनी परिश्रम घेतले. 

    Tags