logo

किनवट, शहरापासून अवघ्या तीन कि.मी. अंतरावरील सिरमेट्टी या गावातील एका आदिवासी शेतकर्याच्या शेतातील उभ्या डोलणार्या कापसाची सुमारे पाचशे झाडे द्वेष भावनेतून कुण्या अज्ञात समाजकंटकाने उपटून फेकली आहेत. सदर घटना काल शनिवारी (दि.08) सायंकाळी घडली असून, या माथेफिरू विरुद्ध किनवट पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यात आली आहे.

सिरमेट्टी येथील दिलीप राघोजी मेश्राम या परधान समाजाच्या आदिवासी शेतकर्याने परिसरातील शेत सर्वे क्र.50/2  क्षेत्र 2 हेक्टर 59 आर. ही जमीन नारायण सुंदरगिरवार या जमीन मालकाला एक वर्षासाठी 60 हजार रूपये मक्ता देऊन कसली होती. महागड्या बीटी जातीच्या कापूसाची लागवड केल्यावर सुमारे एक फुटापर्यंत कापसाची सकस वाढ झाली होती. हे कुणालातरी पाहवले नाही. त्या अज्ञात मत्सरग्रस्ताने काल शनिवारी सायंकाळी संधी साधून जोमाने वाढणारी जवळपास पाचशे रसरसलेली कापसाची झाडे उपटून फेकून नासधूस केली. कुणीतरी आपल्या वाईटावर आहे हे समजून घेऊन दिलीप मेश्राम यांनी भविष्यात अधिक नुकसान होऊ नये यासाठी किनवट पोलीस स्टेशनला फिर्याद देऊन या अज्ञात इसमाचा शोध घेण्याची विनंती केली आहे. 

    Tags