logo

किनवट, करीमाबाद कॉलनी किनवट येथील धिशिया इमामी मुस्लिम (खोजा) समाजाच्या वतीने धर्मगुरू हिज हायनेस प्रिंस करीम आगाखान यांच्या साठाव्या पदग्रहण अर्थात सिंहासनारूढ (तख्तनशीन दिवस) दिवसानिमित्त दांडिया,गरबासह  डायमंड ज्युबिली उत्सवास काल शनिवार (दि.08) पासून मोठ्या धुमधडाक्याने सुरूवात झाली आहे.

जगात वेगवेगळ्या देशात वास्तव्य करणार्या सुमारे पन्नास हजार धिशिया इमामी मुस्लिम (खोजा) समाज आपले प्राणप्रिय इमाम हिज हायनेस प्रिंस करीम आगाखान यांना आपले आजोबा हिज रॉयल हायनेस सर सुलतान महम्मद शाह आगाखान यांचे कडून 49 वे इमामपद मिळाले. त्या घटनेला मंगळवारी (दि.11) साठ वर्ष पूर्ण होत आहेत. मा. आगाखान यांना सर्व शिया ईस्माईली आपले रूहानी रहबर (आध्यात्मिक मार्गदर्शक) मानतात. नुकताच त्यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे हस्ते पद्मविभूषण ही पदवी मिळाली आहे. त्यांच्या आगाखान फाऊंडेशनच्या वतीने भारतासह अनेक देशात जनहिताची कामे केल्या जाते. त्यात रुग्णालय, शाळा, पक्के रस्ते, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन, स्वच्छता अभियान अंतर्गत शौचालय निर्माण आदी कार्यांचा समावेश आहे. येथील समाजाच्या प्रार्थना स्थळावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, दि.08 ते 11 जुलै दरम्यान दररोज रात्री सहा ते अकरा वाजता विशेष प्रार्थना, दांडिया, गरबा यांचे आयोजन करण्यात येत आहे. मुकीसाहेब अकबर भारवाणी व कामडिया साहेब नुरूद्दिन सुदामडिया यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या उत्सवात सर्व समाजबांधव हर्षोल्हासात सहभागी झाले असल्याची माहिती समाजाचे माजी कामडिया साहेब दिन महंमद भारवाणी यांनी दिली. 

    Tags