logo

किनवट, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 24 जून रोजी राज्यातील शेतकर्यांना कर्जमाफी जाहीर केली. मात्र शासनाची भूमिका सर्वसामान्य शेतकर्यांना समजलेली नाही. यामुळे कर्जमाफी झालेल्या शेतकर्यांची नावे बँकांच्या सूचना फलकावर जाहीर करण्यात यावी.तसेच अन्य मागण्यांसाठी येथील शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे व शहरप्रमुख सूरज सातुरवार यांच्या नेतृत्वात ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

येथील भारतीय स्टेट बँके समोर ढोल वाजवून आंदोलन केले. जिल्हा अग्रणी बँकांना आलेल्या सूचना आणि करण्यात आलेली कार्यवाहीची माहिती सर्वसामान्य शेतकर्यांना मिळावी, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या नावाने दिलेल्या कर्जमाफीचे निकष कोणते याबाबत शासकीय परिपत्रक काढण्यात यावे, किती लाभार्थी शासनाच्या निकषास पात्र आहेत याची माहिती द्यावी, आजपर्यंत या योजनेचा लाभ किती शेतकर्यांना मिळाला याची माहिती देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन बँकेच्या व्यवस्थापकांना देण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, शहरप्रमुख सूरज सातुरवार यांच्यासह माजी नगराध्यक्ष सुनिल पाटील, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रशांत कोरडे, ता.प्रमुख प्रमोद केंद्रे, ग्रामीण ता.संघटक विलास गोणेवार, पं.स.चे उपसभापती गजानन कोल्हे, शरद जयस्वाल, राजेंद्र भातनासे, साई रुद्रावार, सचिन पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

    Tags